rashifal-2026

Work from home हा नवीनच रोग

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2024 (17:04 IST)
W F H 
कोरोना ने जाता जाता आपल्याला Work from home हा एक नवीनच रोग देऊन गेला
 
फार पूर्वी प्रत्येक घरात एक बाळंतीण रूम असायची, just like that आताही बऱ्याच घरी ती रूम असते,तेथे एक आय टी इंजिनिअर दिवाणावर वाकडा तिकडा पडलेला असतो, फक्त बाळाऐवजी लॅपटॉप असतो
 
कहर म्हणजे बरेचसे जस्ट मॅरीड पोट्टे रात्री दोन पर्यंत लॅपटॉपशी झुंजत असतात, आता त्या घरातील आजीच्या मांडीवर नातू कसा आणि कधी खेळेल?
 
रिटायर्ड माणूस घरात जड होतो, पण ही बाळंतीण आय टी वाली जड नाही कारण मोठे पॅकेज असते ना आणि घरातील म्हाताऱ्या लोकांना कधीतरी कार मध्ये फिरवतो.
 
घरात चहा, नाश्ता तयार झाला की अगोदर ह्या आय टी बाळंतिणीला मिळाला पाहिजे, फक्त शेक, शेगडी आणि अळीवाची खीर तेवढी बाकी राहते, डिंक लाडू सुद्धा माऊली तयार ठेवते कारण तिच्या नवऱ्याने एवढे मोठे पॅकेज कधी तिला दिलेले नसते ना
 
काही असे आय टी वाले तर दिवाळीत नवे कपडे म्हणून ओन्ली बनियन आणि बर्मुडा घेतात म्हणे.
 
Work from home ही कॉन्सेप्ट आमच्या सोलापुरात नवीन न्हाय, लै वर्षापूर्वी विडी कामगारांना विडीची पाने आणि तंबाखू मोजून दिली जायची आणि ते घरून विड्या करून आणायचे.
 
बऱ्याच ठिकाणी नवरा घरून काम करतो आणि बायको ऑफिसला जाते कार घेऊन, आणि येताना कोथींबिर घेऊन येते.
 
ही अशी दिवाणवरची दिवाणी मंडळी मग वीकेंड ला जवळच्या एखाद्या वागळीवर जाऊन, वडा पाव खाऊन येतात आणि नायगारा फॉल्स ला गेल्यासारखे बडेजाव करतात
 
ही आय टी वाली मंडळी लाँग टूर म्हणून कधी कधी सासुरवाडीला निघतात, U S वरून इंडिया ला निघाल्यासारखे आणि मग धुतलेले, इस्त्री केलेले कपडे शोधत बसतात.
 
कायम स्वरुपी ह्यांना W F H दिले तर पुण्याचे फ्लॅट रेट तरी कमी होतील, एवढेसे खुराडे एक कोटीला म्हणे पुण्यात, कशाला रहायचंय पुण्यात? चितळ्यांची बाकरवडी आणि जोशीचा वडा पाव खायला?
 
ह्या आय टी वाल्यांना आत्ताच बॅक पेन, मणके , कंबरदुखी, eyesight weak होणे असे प्रॉब्लेम सुरू झालेत, मोठे पॅकेज आणखी पाच दहा वर्षांनी ट्रीटमेंला लागणारच आहे म्हणा.
 
आय टी वाल्याला महिना दोन लाख पगार असतो, पण सोसायटी मध्ये पण कोणी ओळखत नाही आणि सरकारी किंवा खाजगी नोकरी करणाऱ्याला पन्नास हजार पगार पण अर्धी सिटी त्याला ओळखते आणि त्याचे कुठले काम अडत नाही, हा फरक आहे.
 
पूर्वी इंग्रजांची वेठबिगारी केली आणि आता अमेरिकेची वेठबिगारी,
काय होणार आहे पुढच्या पिढ्यांचे देव जाणे.

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

Slap Day 2026: प्रेमातील फसवणूक विसरून पुढे जाण्याचा खास दिवस!

थंडावा देणारी आणि पौष्टिकही शाही थंडाई रेसिपी; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नक्कीच बनवा

पोट आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी दररोज 1 केळी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Career Tips: ITI इलेक्ट्रिशियनमध्ये करिअर करा

केस लवकर तेलकट होतात, हे उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments