Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खास नैवेद्य : पुरणाचे दिंड

Webdunia
शनिवार, 2 ऑगस्ट 2014 (17:36 IST)
साहित्य :- पाऊण वाटी चणाडाळ, पाऊण वाटी गूळ, पाऊण वाटी कणिक, दोन टेस्पून तेल, चिमूटभर मिठ, थोडीशी वेलचीपूड किंवा जायफळ पूड (वासापुरती).
 
कृती :- प्रथम पुरणपोळीसाठी जसे बनवतो तसे पुरण बनवून घ्यावे. त्यासाठी चणाडाळ धुवून मऊसर शिजवून घ्यावी (साधारण चणाडाळीच्या अडीच ते तीनपट पाणी घालावे). डाळ शिजली कि चाळणीत घालून पाणी निथळू द्यावे. डाळीतील पाणी निथळल्यावर डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालावा. मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. आटवताना सतत ढवळत राहावे. तसे न केल्यास मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात (आवडत असल्यास) वेलचीपूड घालावी. पळीने चांगली घोटून घ्यावी. मिश्रण घट्टसर झाले कि पातेले गॅसवरून उतरवावे. पुर्ण गार होवू द्यावे. कणकेत मिठ घालावे. त्यावर २ टेस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्टसर मळून घ्यावी. थोडावेळ झाकून मुरू द्यावी. कणकेचे ८ ते १० गोळे करावे. जर मोदकपात्र असेल तर त्यामध्ये २ लिटर पाणी गरम करत ठेवावे. नाहीतर मोठ्या पातेल्यात पाणी गरम करावे. त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा.
 
कणकेच्या गोळ्याची पातळ पुरी लाटावी, मधोमध १ चमचा पुरण ठेवावे. समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावे. दिंड मोदकाप्रमाणे १५ ते २० मिनीटे शिजवून घ्यावे. गरमागरम दिंडं तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवून खायला द्यावे.

Lok Sabha Election 2024 : मुंबईतील 6 जागांवर आज मतदान, 35000 पोलीस तैनात, केंद्रीय दलेही सज्ज

Lok Sabha Election 2024 : मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान आज, लोकसभेच्या कोणत्या जागांवर आणि कोण उमेदवार आहे जाणून घ्या

RR vs KKR : कोलकाता-राजस्थान सामना पावसामुळे रद्द

सात्विक-चिराग जोडी विजेती ठरली, लिऊ आणि चेन यांना पराभूत केले

SRH vs PBKS : हैदराबादने पंजाबचा चार गडी राखून पराभव केला

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

Skin Care Tips:डागांपासून मुक्त त्वचेसाठी घरीच बनवा सिरम

एमबीए इन इंफॉर्मेशन सिस्टम्स मध्ये करिअर करा

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

Show comments