Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुढीपाडवा स्पेशल : पुरणाच्या पोळीचा बेत...

Webdunia
शुक्रवार, 8 एप्रिल 2016 (15:19 IST)
महाराष्ट्रीयन अर्थात मराठी लोकांमध्ये गोडधोडाचा बेत म्हटलं की पुरणाची पोळीचे नाव पहिला येते. ही पोळी चणा डाळीची केली जाते. गुळ घालून पुरण बनविले जाते. काहीजण साखरही घालून पुरण बनवितात. गुळामुळे मात्र पोळीला एक प्रकारचा खमंगपणा येतो. मग ही पुरणाची पोळी बनवायची तरी कशी.. चला पाहूयात..
पुरण साठी साहित्य 
२ १/२ कप चाणा डाळ
२ १/२ कप चिरलेला गुळ
१/२ कप साखर
१ टीस्पून जायफळाची पूड
 
कणकेसाठी लागणारे साहित्य 
२ १/२ कप कणिक
१/२ कप  मैदा
१/३ कप तेल (२ टेबल स्पून + १/४ कप + १ टेबल स्पून)
 
मीठ (कणभर)
पाणी (लागेल तसं कणिक भिजवायला)
तांदुळ पिठी (लागेल तशी पोळ्या लाटायला) 
पुरण यंत्र 
सापीठाची(बारीक)चाळणी (कणिक चालायला) 
 
पुरणाची कृती
प्रथम चणा डाळ बोटाचा पहिल्या पेरा पर्यंत येईल एवढ्या पाण्यात कूकर मध्ये शिजवुन घ्य. ३-४ शिट्ट्या देऊन गेस बारीक करून थोडा वेळ ठेवा. शिट्टी पडल्यावर डाळ काढून चाळणीवर निथळत ठेवा. निथळलेले पाणी(ह्यालाच कट म्हणतात) एका डब्यात भरून ठेवा, हे पाणी आपण कटाच्या आमटी करता वापरणार आहोत.
 
आता डाळीत चिरलेला गुळ आणि साखर घाला. हे सर्व मिश्रण एका मायक्रोवेव्ह चा भांड्यात घाला.
 
मायक्रोवेव्हमध्ये पुरण शिजवुन घ्या. साधारण १५ ते १७ मिनिटे लागतात. ४ मिनिटे आधी ठेवा आणि मग लागेल तशी मिनिटे ठेवा. दर ४-५ मिनिटांनी पुरण चमच्याने हलवुन घ्या. पुरणात चमचा व्यवस्तीत उभा राहिला की पुरण झाले असे समजावे.
 
पुरण तयार झाल्यावर त्याच्यात जायफळाची पुड घाला आणि एकत्र कर. नंतर हे पुरण, पुरण यंत्रातुन काढुन घ्यावे. पुरण यंत्रात शेवटचे राहिलेले पुरण काढून कटा बरोबर एकत्र करून बाजुला ठेवुन  द्या. हे तयार झाले तुमचे पुरण.
 
कणकेची कृती 
चाळणीने कणिक चाळून घ्यावी. चाळणी वर राहिलेला कोंडा टाकुन द्यावा. त्याच चाळणीत मैदा देखील चाळून घ्यावा. नंतर कणकेत मीठ घाला आणि २ टेबल स्पून तेल घाला, थोडं थोडं  पाणी घालुन  कणिक अगदी सैलसर भिजवावी. आता १/४ कप तेल घालुन कणिक चांगली मलवि. कणिक एकदम सैल असली पहिजे. कणिक माळून साल्यावर बोटाने कणकेवर खळगे बनवा आणि त्याचात साधारण १ ते २ टेबल स्पून ओता. झाकण ठेवुन कणिक १ तास बाजुला ठेवुन घ्या.
 
पोळ्या लाटायला कणकेची पुरी पेक्षा थोडी जास्ती गोळी घ्या आणि त्या गोळीच्या दुप्पट पुरणाचा गोळा घ्या.
 
ह्या गोळीत पुरण भरा आणि एक मोठा गोळा तयार करा. हातानी दाबून हा गोळा चपटा करा व तांदुळाच्या पिठीत घोळून घ्या. आता पोळपाटावर तांदुळ पिठी भुरभुरून टाका. अगदी सैल हातानी कणकेचा पुरण भरलेला गोळा घेऊन अलगद लाटा. लाटताना मध्ये मध्ये पोळपाट हलवावा म्हणजे पोळी चिकटत नाही. आता लाटण्यावर अलगद गुंडाळुन पोळी गरम तव्यावर टाका आणि दोन्ही बाजूने छान भाजुन घ्या.
 
हीच कृती उरलेल्या पोळ्या करायला वापरा . ह्या मापाचा साधारण १७ मोठ्या आकाराच्या पोळ्या होतात. पोळी गार झाल्यावर भरपुर तुप घालुन खावी. खास बटाटा भाजी आणि कटाची आमटी असेल तर पुरणाच्या पोळीची मजा काही औरच.

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments