जिलेबी तर आपण बऱ्याच वेळा बनविली असणार आज आम्ही आपल्याला इमरती बनविण्याची रेसिपी सांगत आहोत चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य -
250 ग्राम सोललेली उडीद डाळ,50 ग्राम आरारूट,500 ग्राम साखर,चिमूटभर खाण्याच्या केशरी रंग.तळण्यासाठी तूप,जिलेबी बनविण्यासाठी लागणारा गोल भोक असलेला जाड कापड.
कृती-
सर्वप्रथम उडीद डाळ धुवून 4 -5 तास पाण्यात भिजत ठेवा.पाणी निथरुन मिक्सरमध्ये वाटून घ्या.या वाटण मध्ये आरारूट आणि खाण्याचा केशरी रंग घाला आणि चांगले फेणून घ्या.साखरेचा दीड तारी पाक तयार करा.
आता एका पसरट कढईत तूप गरम करा.जिलेबी करण्याच्या कपड्यात डाळीचा घोळ भरून घ्या आणि कापडाचं तोंड घट्ट बंद करून घ्या गरम तुपात गोलाकार इमरती बनवा आणि तळून घ्या.तळल्यावर तूप निथारून इमरती साखरेच्या पाकात घाला आणि थोड्यावेळ त्या पाकात पडू द्या. नंतर पाकातून काढून चविष्ट इमरती सर्व्ह करा.