Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Diwali special Rasgulla Recipe : घरच्या घरी पटकन बनवा मऊ रसगुल्ले , रेसिपी जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (15:29 IST)
Diwali special Rasgulla Recipe :अनेकदा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. दिवाळीचा सण 9 नोव्हेंबर पासून सुरु होत आहे. दिवाळीला चकली, करंज्या , अनारसे, शंकरपाळे, कडबोळी, लाडू, चिवडा हे सर्व फराळाचे पदार्थ तर बनतातच. रसगुल्ला हा असा गोड आहे, जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तथापि, घरी बनवणे देखील खूप सोपे आहे.या शिवाय पाहुणे आल्यावर घरीच बनवा मऊ रसगुल्ले. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.   
 
साहित्य:
 
1 लिटर दूध
3 चमचे लिंबाचा रस
1 टीस्पून कॉर्नफ्लोअर
1 कप साखर
4 कप पाणी
 
कृती- 
 
रसगुल्ला बनवण्यासाठी सर्व प्रथम एका जड तळाच्या पॅनमध्ये दूध गरम करा. दुधाला उकळी आली की गॅस बंद करा आणि 1/2 कप पाणी घाला आणि गॅस थोडे कमी करा. दूध फाटे पर्यंत लिंबाचा रस घाला. फाटलेले दूध मलमलच्या कपड्यातून गाळून घ्या. आता छेना" किंवा "पनीर" तयार आहे. छेनातील सर्व पाणी काढून टाकण्यासाठी मलमलचे कापड पिळून घ्या. एका प्लेटमध्ये छेना काढून त्यात कॉर्नफ्लोअर घाला. छेनाला हाताने 10 मिनिटे मॅश करा, छेना मऊ आणि गुळगुळीत होईल. ही एक अतिशय महत्त्वाची पायरी आहे, जी तुम्ही अजिबात चुकवू नका, अन्यथा तुमचा रसगुल्ला मऊ होणार नाही.
 
मॅश केल्यानंतर छेनाचे छोटे गोळे बनवा. दरम्यान, एका पॅनमध्ये साखर आणि पाणी घाला आणि उच्च तापमानावर उकळू द्या. रसगुल्ल्याचे गोळे उकळत्या पाकात टाका. रसगुल्ला साखरेच्या पाकात 15-20 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. रसगुल्ला पाका  बरोबर थंड करून थंडगार सर्व्ह करा. 
 
रसगुल्ले बनवण्यासाठी रुंद पॅन वापरा. उकळत्या साखरेच्या पाकात टाकल्यावर त्यांचा आकार वाढतो, त्यामुळे रसगुल्ले शिजवण्यासाठी पॅनमध्ये पुरेशी जागा असावी.
 
साखरेचा पाक बनवताना, पाणी आणि साखर यांचे प्रमाणाकडे देखील लक्ष द्या. उदाहरणार्थ, 1 कप साखरेसाठी, तुम्हाला 4 कप पाणी घालावे लागेल आणि ते उच्च आचेवर उकळवावे लागेल.
 
साखरेच्या पाकात शिजवताना रसगुल्ल्यांचा आकार वाढतो, म्हणून पनीरचे गोळे बनवताना ते लहान ठेवा. रसगुल्ले शिजत असताना, गॅसची फ्लेम हाई असावी.
 
Edited by - Priya Dixit   
 
 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

उन्हाळ्यात रोज अंडी खाणे योग्य आहे का? प्रमाण काय असावे जाणून घ्या

मानसिकरीत्या आहात चिंतीत तर हृदयावर पडेल दबाव, करा हे योगासन

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

पुढील लेख
Show comments