Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hapus हापूस आंबा म्हणजे काय ? तो खरा कसा ओळखावा जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 13 एप्रिल 2023 (15:49 IST)
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, आणि पालघर ह्या पाच जिल्ह्यातल्या आंब्यालाच ह्यापुढे हापूस आंबा असे नाव लावता येणार आहे. हे साध्य झाला आहे भौगोलिक मानांकन ह्या भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिला आहे.

हापूस आंबा हा फळांचं राजा आहे. त्याचे नाव काढताच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. त्याचे कारण तसेच आहे.आंबा ह्या फळाची चव अवीट आणि मधुर आहे. आंबा ह्या फळाची चव इतर फळांपेक्षा अप्रतिम आहे आणि त्याचे गुण इतर फळांपेक्षा वैशिष्ट्य पूर्ण आहेत म्हणून त्याला फळांचा राजा म्हणले जाते त्यामुळेच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.
 
आंब्याला संस्कृत मध्ये आम्र असे म्हणतात.आंब्याची आगमनाची चाहूल आंब्याच्या झाडाला मोहोर आल्यावर समजते. त्या मोहोराचा सुद्धा एक मंद असा सुवास असतो.

ह्या फळाच्या आगमनाची वर्दी पक्षी सुद्धा देतात.कोकीळ हा पक्षी त्यावेळेस कुहू कुहू करून गाणी म्हणत असतो हे फळ जेव्हा कच्चे असते तेव्हा त्याला कैरी म्हणून ओळखतात. त्याचे सुद्धा विविध उपयोग आहेत.

रत्नागिरी हापूस आंब्याची वेग वेगळी नावं
रत्नागिरी आंबा, रत्नागिरी मँगो, रत्नागिरी अल्फोन्सो मँगो, हापूस आंबा रत्नागिरी, रत्नागिरी अल्फोन्सो आंबा
देवगड हापूस आंब्याची वेग वेगळी नावं देवगड आंबा, देवगड मँगो, देवगड अल्फोन्सो मँगो, देवगड अल्फोन्सो आंबा, हापूस आंबा देवगड.

हापूस आंब्याची पदार्थ कैरी पासून मुरंबा जाम, जेली, चॉकलेट्स, पन्हे, लोणचे, सरबत बनवतात तसेच जेवणात विविध भाज्या व माश्याचे सार ह्या मध्ये कैरी घातली जाते त्यामुळे त्या जेवणाची लज्जत वाढते. कैरी मुळे आजारी माणसाच्या तोंडाला चव येते. हि कैरी जेव्हा पिकली जाते तेव्हा त्याला आंबा म्हणतात.
 
आंब्याच्या अनेक जाती आहेत. त्याचे वैशिष्ट्य असे कि प्रत्येक प्रांतात त्याची चव रंग रूप ह्यात वेगळे पणा असतो. दक्षिण भारत, उत्तर भारत, पश्चिम भारत, प्रत्येक मातीमध्ये निसर्गाने त्याला चवीचे आणि आकाराचे वेगळे वरदान दिले आहे.
 
आंब्याचा रंग हा मोहक पिवळा परंतु वेगवेगळ्या आंब्याच्या जाती प्रमाणे त्याच्या रंग छटा बदलतात. तोतापुरी, नीलम, दशहरी, पायरी, रायवळ, लंगडा, रूमानिया, हापूस, बाल्साल्ड आंबा, अश्या एकूण १३०० पेक्षा जास्त जाती आहेत. सर्वात लोकप्रिय आंब्याची जात आहे ती म्हणजे हापूस.
कोकणातील हापूरस आंब्याची चव हि अतिशय अप्रतिम असते. हापूस आंबा कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया होय.
 
त्याच्या चवीने अख्या जगाला वेड लावले आहे. त्याची चव इतर कोणत्याही आंब्याच्या फळाला येत नाही. कोकणाखेरीज जरी इतर कुठेही ह्या फळाची लागवड केली तरीही ह्याच्या सारखी चव नाही म्हणून तर ह्याला कोंकण चा राजा म्हणून ओळखतात. असे म्हणतात कि आंबा हा अक्षय तृतीया पासून खायला सुरवात करतात.
कोकणातील हापूस आंबा हा आजमितीस सात समुद पार पोहचला आहे. हापूस आंब्याला आखाती देश, पश्चिमेकडील देश येथे प्रचंड मागणी आहे. आणि ह्या आंब्या मुळे देशाचे परकीय चलन सुद्धा वाढण्यास मदत होते. आंबा ह्या फळांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.
 
कारण ह्या फळाची लागवड ग्रामीण भागात एक उपजीविकेचे साधन आहे. आंब्या मुळे गृह उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. आंबा ह्या फळापासून आमरस, जाम, मँगो मिल्क शेक, आईसक्रीम, आंबा पोळी, आंबा बर्फी, वडी बनवली जाते. हे सर्व उद्योग जिथे आंब्याचे उत्पन्ने मिळते तिथे केले जातात आणि त्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतो.
 
आमरस पुरी हा तर अत्यंत लोकप्रिय भोजनाचा प्रकार आहे. संपूर्ण भारतात तो चवीने खाल्ला जातो. तसेच आंब्याच्या हंगामात आमरस पुरी ने एक प्रकार भारतीय मेजवानीत मानाचे स्थान पटकावले आहे,
आंब्या मध्ये अनेक गुणधर्म आहेत. त्यात प्रतिकार शक्ती वाढवण्याचा गुणधर्म आहे. तसेच आंबा हा शक्तिवर्धक आहे. आंब्यात अ आणि क जीवनसत्व आहे. तसेच आंबा त्वचा आणि नेत्र विकार उपयोगी आहे.
आंब्याच्या झाडांची पाने सुद्धा औषधी आहेत.
 
हापूस आंबा
काही सणांना आंब्याच्या पानांचे तोरण झेंडू फुलांमध्ये ओवून घराच्या मुख्य दरवाज्याला लावतात. आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात आवर्जून केला जातो.
तसेच आंब्याच्या झाडांचे लाकूड सुद्धा फर्निचर साठी वापरतात.
असा हा आंबा आणि त्याचे डेरेदार झाड अनेकांना सावली देते व अनेक पक्ष्यांना घरटे म्हणून आधार देते.
 
हापूस आंबा कसा ओळखावा
कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, आणि पालघर ह्या पाच जिल्ह्यातल्या आंब्यालाच ह्यापुढे हापूस आंबा असे नाव लावता येणार आहे.
हे साध्य झाला आहे भौगोलिक मानांकन ह्या भारत सरकारच्या पेटंट विभागाने दिला आहे.
हापूस आंबा किंमत
खऱ्या हापूस आंब्याची किंमत नेहमी जास्त असते कर्नाटक हापूस आंब्याची किंमत ही नेहमी स्वस्त असते पण चवीत खूप खराब असते.
हापूस आंब्याची वैशिष्ठ
हापूस आंब्याचा आकार हा विशिषष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते, हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो.
आंब्याची साल म्हणजे स्किन हे प्लेन असते ते कुठे ही खडबडीत नसते, सालीवर पांढऱ्या फुल्यांच्या लहान छिद्र असतात पातळ साल असता, नाममात्र फायबर असता.  
खरोखर आंबा हे फळ अमृततुल्य फळ आहे यात काही शंका नाही.
 
खरा हापूस आंबा नेमका कसा ओळखाल
कोकणातील हापूस आंब्याची चव ही अतिशय अप्रतिम असते. पण अनेकदा हापूस आंब्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जाते.
सध्या बाजारातील अनेक विक्रेते सामान्य हापूस म्हणून कोणताही आंबा ‘हापूस आंबा’ किंवा ‘अल्फान्जो आंबा’ या नावाने विकतात.
त्यामुळे खरा हापूस आंबा ओळखणे कठीण झाले आहे. हापूस आंबा ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
हापूस आंब्याच्या चवीने संपूर्ण जगाला वेड लावलं आहे. त्यामुळे या फळाची चव इतर कोणत्याही आंब्याच्या प्रजातीला येत नाही.
हापूस आंबा हे कोकणच्या मातीतील उत्पादन आहे. कोकणातील हापूस आंबा म्हणजे निसर्गाची किमया असल्याचे मानले जाते.
विशेष म्हणजे कोकणाव्यक्तिरिक्त या फळाची लागवड इतर कुठेही केली, तर त्याला ती विशिष्ट चव येत नाही. म्हणूनच हापूस आंब्याला कोकणचा राजा म्हणून ओळखतात.
चांगली गुणवत्ता असलेला हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो. त्या सुंगधामुळे तो दूरवरुनही पटकन ओळखता येतो.
नैसर्गिकरित्या गवताच्या अढीमध्ये पिकवलेल्या आंब्याच्या घमघमाट दूरपर्यंत पसरतो.इतर भागातून येणारे आंबे जे दिसायला जरी हापूस आंब्यासारखे असेल तरी त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित त्याला गंध येतो.
हे आंबे रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते अजिबात सुगंध देत नाहीत.
नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात. तेच रासायनिकरीत्या पिकलेले आंबे पिवळे आणि कठोर असतात.
नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा रंग हा पिवळसर आणि फिकट हिरवा असतो. तर रासायनिकरीत्या पिकलेले आंबे एकसारख्याच रंगाचे दिसतात.
पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर अजिबात चिकटून बसत नाही.
हापूस आंब्याचा वास आणि त्याचा केशरी गर यावरून तो सहजरित्या ओळखता येतो.
जर तुम्ही घरी आंबे आणले असतील तर ते एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात बुडवून ठेवा.
जर तो आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकवण्यात आला आहे, असे समजावे.
मात्र जर आंबा पाण्यावर तरंगत असेल तर आंबा रसायने वापरुन पिकवलेला आहे, हे स्पष्ट होते.

Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

Winters : जर तुम्हाला कोरडी त्वचा टाळायची असेल तर हे सोपे घरगुती उपाय ताबडतोब करून पहा.

हिवाळ्यात डोळ्यांच्या आरोग्यासाठी या 5 हिरव्या भाज्या सुपर फूड आहेत

अग्निसार प्राणायाम केल्याने बद्धकोष्ठता, लठ्ठपणा यासह सर्व आजार बरे होतात

नैतिक कथा : हत्ती आणि सिंहाची गोष्ट

Quick Recipe : अंड्याचा पराठा

पुढील लेख
Show comments