अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर किंवा जेवण करतांना गोड खूप आवडते. तसेच भारतीय प्रसादांमध्ये रव्याचा शिरा हा एक नंबरला असतो. पण कधी कधी हा च रव्याचा शिरा खाऊन कंटाळा येतो. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तीन प्रकारच्या शिऱ्याची रेसीपी. तर चला लिहून घ्या.
1. सीताफळ शिरा
साहित्य-
किसलेले दोन सीताफळ
एक कप दूध
शुद्ध तूप 1/4
वेलची पूड 1/4
बारीक कापलेले मेवे
साखर
कृती-
पॅनमध्ये तूप गरम करून घ्यावे. त्यामध्ये सीताफळ घालून पाच ते सात मिनिट परतवावे. सीताफळ मऊ झाल्यानंतर त्यामध्ये दूध घालावे. तसेच सतत हवेत राहावे नंतर साखर घालावी व वेलीची पूड घालावी. हे मिश्रण काही काळ परत हलवावे. मग मेवे घालून गार्निश करावे व गरमगरम सर्व्ह करावा.
2. बीटाचा शिरा
साहित्य-
किसलेले दोन बिट
फुल क्रिमी दूध दोन कप
तूप चार चमचे
मेवे
वेलची पूड
साखर
कृती-
एका पॅनमध्ये तूप घालावे व गरम झाल्यानंतर त्यामध्ये किसलेले बिट घालावे. व पाच ते सहा मिनिट शिजवावे. आता दूध घालून घट्ट होइसपर्यंत शिजवावे. त्यामध्ये साखर, मेवे, वेलची पूड घालून दोन ते तीन मिनिट शिजवावे. तसेच गरमगरम सर्व्ह करावे.
3. रताळ्याचा शिरा
साहित्य-
रताळे 2 मोठ्या आकाराचे
दूध एक कप
तूप 1/4
वेलची पूड 1/4
साखर
मेवे
कृती-
रताळे वाफवून घ्यावे. थंड झाल्यानंतर साल काढून मॅश करून घ्यावे. आता पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये मॅश केले रताळे घालावे. तसेच थोडयावेळाने दूध घालावे. व शिजू द्यावे. मग त्यामध्ये साखर घालून मेवे घालावे. व गरमागरम सर्व्ह करावा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik