Dharma Sangrah

होळी स्पेशल : पुरण पोळी

Webdunia
महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनात पुरणपोळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुरणपोळी करण्याची पद्धत प्रांतानुसार बदलते. विदर्भातील पोळी पुरणाने ठासून भरलेली, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुरणाचा भरणा कमी असलेली. पुरणाची गोडी थेट सात समुद्रापार करून युरोप अमेरिकेतही पोहचली आहे.

साहित्य - एक किलो हरभर्‍याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तूप.

कृती : हरभर्‍याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी. गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी.

गॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो. डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर घालावी. मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे. चांगली मळलेली कणिक आणखी एकदा तुंबून घ्यावी.

कणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे. पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. ठासून पुरण भरलेली पोळी लाटल्यावर अलगद तव्यावर टाकावी.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

MSRTC Vacancy एसटी महामंडळात १७,७४२ पदांची महाभरती: कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार प्राधान्य

Baby Shower डोहाळेजेवण निमित्त सात्विक, चविष्ट आणि पारंपरिक मेन्यू पाककृती

उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी कोणत्या भाज्या सर्वोत्तम आहेत जाणून घ्या

जेईई मध्ये कमी स्कोअर पडले, हे अभ्यासक्रम निवडा नशीब बदलेल

भेगा पडलेल्या टाचांसाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments