Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ganesh Chaturthi 2025 गणपतीला प्रिय असलेल्या चविष्ट मोदकाच्या वेगवेगळ्या पाककृती

modak
, मंगळवार, 26 ऑगस्ट 2025 (14:00 IST)
गणपतीला प्रिय असलेल्या व गणेशोत्सवात विविध प्रकारचे मोदक बनवण्यासाठी या रेसिपी नक्कीच उपयोगी ठरतील. 
तळलेले मोदक
साहित्य-
एक वाटी- मैदा किंवा गव्हाचं पीठ
दोन चमचे- रवा पर्यायी, कुरकुरीतपणासाठी 
दोन चमचे- तेल (मोहनासाठी)
पाणी 
चिमूटभर मीठ
तळण्यासाठी तेल
सारण- खोबरं-गूळ किंवा खवा-खडीसाखर 
कृती-
सर्वात आधी मैदा, रवा, मीठ आणि तेल एकत्र मळून कणीक तयार करा. १५ मिनिटं झाकून ठेवा.सारण वरीलप्रमाणे तयार करा. कणकेची छोटी पारी पाडून त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या. आता मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
थंड झाल्यावर सर्व्ह करा.
 
खव्याचे मोदक
साहित्य-
एक वाटी- खवा 
अर्धा वाटी- पिठीसाखर
एक चमचा- वेलची पूड
एक चमचा- तूप
बाहेरील आवरणासाठी-तांदळाचं पीठ किंवा मैदा 
ALSO READ: Ukadiche Modak उकडीचे मोदक (step by step)
कृती-
सर्वात आधी तुपात खवा मंद आचेवर परतून घ्या. पिठीसाखर आणि वेलची पूड घाला.
मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि थंड करा. आता उकडीच्या कणकेच्या पर्‍यात किंवा मैद्याच्या पर्‍यात सारण भरून मोदक बनवा. वाफेवर शिजवून किंवा तळून सर्व्ह करा.
 
रव्याचे मोदक
साहित्य-
एक वाटी- रवा  
एक वाटी- दूध
अर्धा वाटी- साखर
एक चमचा- तूप
एक चमचा- वेलची पूड
काजू/बदाम (सजावटीसाठी)
ALSO READ: Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवा चविष्ट बेसनाचे मोदक
कृती- 
सर्वात आधी तुपात रवा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. दूध आणि साखर घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. वेलची पूड घालून थंड करा. मिश्रणाला हाताने मोदकाचा आकार द्या आणि काजू,बदामाने सजवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Women's Equality Day 2025 महिला समानता दिन