साहित्य:
दीड कप काजूची बारीक पूड
1 कप पिठी साखर
अर्धा कप मिल्क पावडर
1/4 कप दूध
1 चमचा तूप
1/4 चमचा वेलचीपूड
चांदीचा वर्ख सजावटीसाठी आवड असल्यास
कृती:
1 कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बाउल मध्ये एकत्र करा. चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. मिश्रण 2 मिनिटे मायक्रोवेव करा. मधून तीन वेळा तरी ढवळा. नंतर मिश्रण बाहेर काढून ढवळून घ्या. मिश्रण जरा आटले की त्यात लागल्यास थोडी काजू पावडर घाला. मिसळून गोळा तयार करा. पोळपाटाला किंवा फ्लॅट प्लेटफॉमवर तुपाचा हात लावून घ्या त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटा.चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापून घ्या.