Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडं

नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडं
, बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (11:43 IST)
साहित्य:
1 कप चणाडाळ
1 कप गूळ
1 कप कणिक
२ टेस्पून तेल
चिमूटभर मिठ
१/४ टिस्पून वेलचीपूड किंवा जायफळ पूड
 
कृती:
प्रथम पुरणपोळीसाठी ज्याप्रकारे पुरण तयार करतो तसे बनवावे. त्यासाठी चणाडाळ शिजवून घ्यावी. चाळणीत घालून पाणी निथळून डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालून मध्यम आचेवर हे मिश्रण आटून घ्यावं. आटवताना ढवळत राहावं. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण घट्टसर झाल्यावर भांड गॅसवरून उतरुन घ्यावं. गार होऊ द्यावं. 
 
कणकेत मिठ आणि २ टेस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्टसर मळून घ्यावी. थोडावेळ झाकून मुरू द्या. नंतर कणकेचे ८ ते १० गोळे करावे. कणकेच्या गोळ्याची पातळ पुरी लाटून मधोमध १ चमचा पुरण ठेवावं व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावं. 
 
मोदकपात्र असेल २ लिटर पाणी गरम करयाला ठेवावे. मोठ्या पातेल्यात देखील पाणी गरम करता येईल. त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा. १५ ते २० मिनीटे वाफू द्यावे.
 
गरमागरम दिंडं तूप घालून नैवेद्य दाखवावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SSC CET:अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द