Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमाष्टक

मनोहर धडफळे

Webdunia
( बा! मन्या.... प्रेम कर.)

मन्या सज्जना प्रेम पंथेचीं जावे!
तरी ही 'करी' भेट ती नेत जावे!
तिला त्याज्य ते सर्व सोडोनी द्यावे!
तिला मान्य ते सर्व भावे करावे ।।1। ।

तुला व्हायचे बा मन्या प्रेमदेव!
तरीं दृष्टी तू सर्वत्र ठेव!
तुला भेंटेल जी प्रेमे उदार!
तिचे प्रेम स्वीकार, स्वीकार स्वीकार ।।2।।

प्रभाते मन्या नेम बांधून घ्यावा!
गजरा फुलांचा तिला नित्य द्यावा!
सदा प्रेममार्गी करी वाटचाल!
धरी रे मन्या मन्या हाचि तू एकताल ।।3। ।

मन्या सज्जना द्रव्य खर्चीत जावे!
तिचे मागणे नित्य पुरवीत जावे!
चिंता धनाची वाहू नये रे!
हिशेब कधीही पाहू नये रे ।।4।।

मन्या आड येता तिचे सर्व भाऊ!
डरोनी त्यांसी नको माघार घेऊ!
वेळीच हाण तू त्यांनाही लाथा!
' प्रसंगी' टेकवी सन्मूख मा था ।।5।।

मन्या सज्जना प्रेम करण्यासी पाहे!
प्रसन्न 'मजनू' सदा त्यांसि आहे!
तया मित्र होती सदा साह्यकारी!
हेचि व्रत म्हणोनी तुवा अंगिकारीं।।6। ।

' प्रयत्नांती ईश्वर' आहे मन्या रे!
ठाऊक हे ही सकळा जना रे!
जपावे मन्या तरी तू 'प्रेम-प्रेम'!
धरी रे मन्या हाचि तू 'नित्यनेम' ।।7।।

' जगी सर्व सुखी' असा कोण आहे!
' विचारी मन्या', तू चि शोधोति पाहे!
करी नित्य-नेमे जो 'प्रियाराधना'!
असे प्रिय तोचि 'सकल नारी-जना।।8। ।

( रामदास स्वामींनी क्षमा करावी)

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

या 5 खोट्यांमुळे नाती मजबूत होतील

Cucumber Mint Detox Drink काकडी-पुदीना ड्रिंक, विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर काढण्यास मदत होईल

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

दहा नियमांचे पालन केल्यास होत नाही गंभीर आजार

Perfect Eyeliner या टिप्स आणि ट्रिक्सच्या मदतीने परफेक्ट आयलायनर लावा

Show comments