Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वस्तुप्रमाणे इतरांच्या काही गोष्टी मुळीच वापरू नका

Webdunia
सोमवार, 13 जुलै 2020 (11:22 IST)
वास्तूशास्त्रानूसार इतरांच्या काही गोष्टी वापरू नयेत. कारण त्यांच्यामधील ग्रहदोषांमुळे त्या वस्तूंच्या माध्यमातून तुमचं नुकसान होऊ शकतं. यासाठी दुसऱ्यांनी वापरलेल्या या गोष्टी चुकूनही वापरू नका. यासाठीच अशा कोणत्या गोष्टी नुकसानकारक आहेत हे जरूर जाणून घ्या. तसेच
चप्पल-
समजा तुम्ही एखाद्या मंदीरात गेला आणि तिथे तुमच्या चपला चोरी झाल्या तर रागाने इतरांच्या चपला घालून घरी जावू नका. कारण इतरांच्या चपलांमधील निगेटिव्ह ऊर्जा तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. असं म्हणतात की चपला चोरीला जाणं म्हणजे दारिद्र कमी होणं. त्यामुळे इतरांचे दारिद्र घरी घेऊन येवू नका.

रुमाल -
इतरांचा वापरेला रूमाल वापरल्यामुळे घरात क्लेष निर्माण होऊ शकतात. शिवाय वैज्ञानिकदृष्टा बघायला गेलं तर इतरांच्या रूमालामधील घाण अथवा बॅक्टेरियामुळे तुम्हाला इनफेक्शन होऊ शकतं. त्यामुळे इतरांचे वापरलेले रूमाल वापरणं धोक्याचं असू शकतं.

गादी अथवा बेड -
प्रत्येकाने आपल्या गादी अथवा बिछान्यामध्ये झोपणं हेच हितकारक असू शकतं. इतरांच्या बेडवर झोपण्यामुळे वास्तूदोष होऊ शकतो. इतरांच्या बेडवर झोपल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.

कपडे –
बऱ्याचजणांना इतरांचे वापरलेले कपडे घालण्याची सवय असते. भावंडे अथवा मित्र-मैत्रीणींचे कपडे वापरण्यात काहीच चुकीचे नाही असे अनेकांना वाटते. अनेकजण वापरलेले कपडे इतरांना दान करतात. मात्र असे इतरांचे कपडे घालणं धोक्याचं ठरू शकतं. कारण असं केल्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये येते.

पेन -
बर्याच लोकांना काहीतरी लिहावं लागतं तेव्हा पटकन इतरांचं पेन ते वापरतात मात्र काम झाल्यावर ते पेन आपल्याच खिषात टाकून निघून जातात. एकतर असं वागणं हे मुळातच चुकीच आहे शिवाय याचे चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. कारण असे केल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. यासाठी कोणाचेही पेन वापरू नका आणि कोणालाही तुमचे पेन वापरण्यास देऊ नका.

घड्याळ -
हातामध्ये वापरण्याचे घड्याळ देखील कधीच कोणी वापरलेले घेऊ नये कारण त्यामध्ये देखील वापरण्याऱ्या व्यक्तीची निगेटिव्ह अॅनर्जी असते. ज्यामुळे तुमचे अतोनात नुकसान होऊ शकतं. असं वापरलेलं घड्याळ वापरल्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान आणि अपयशाचा सामना करावा लागू शकतो.
तुमचं लकी चार्म -
प्रत्येकाच्या आयुष्ययात एक लकी चार्म असतो. एखादी अशी गोष्ट जी तुमच्यासाठी फारच लकी असते. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळतो अशी गोष्ट कधीच इतरांना देऊ नका. कारण यामुळे देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांचंही नुकसान होऊ शकतं.

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments