Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्त्रियांना तव्याशी निगडित या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे

स्त्रियांना तव्याशी निगडित या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे
, गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (13:42 IST)
घरातील स्वयंपाकघराचा कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात खूप महत्त्व असतो. असे नाही की स्वयंपाकघर फक्त आपले पोट भरण्यासाठी आवश्यक आहे, परंतु त्यात घराच्या वास्तूचा देखील समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला तव्याशी संबंधित काही नियम सांगणार आहोत, ज्यांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण तवा वास्तूचे निराकरण देखील करतो आणि वास्तुदोषही निर्माण करतो. तर जाणून घेऊ तव्याशी निगडित काही नियम जे प्रत्येक स्त्रीला माहीत असणे गरजेचे आहे.  
 
-  बाहेरून येणार्‍या लोकांची तव्यावर नजर पडणे देखील अशुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तवा अशा जागेवर ठेवा जेथून बाहेरच्या लोकांची नजर त्यावर पडू नये.  
 
-  किचनमध्ये तवा किंवा कढई उलटे करून ठेवू नये. वास्तूच्या म्हणण्यानुसार असे केल्याने घरात अचानक वाईट घटनेची शक्यता वाढते.
 
- तव्यावर कधीही पाणी टाकू नये. शास्त्रानुसार असे केल्याने छन्न करून होणार्‍या आवाजामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ लागतात.  
 
- बरेचदा लोक रात्रीचे जेवण शिजवल्यानंतर तवा धुअत नाही. परंतु असे करणे अन्नाचा अपमान मानला जातो. दररोज रात्री स्वयंपाक केल्यावर, तवा   व्यवस्थित स्वच्छ करा आणि बाजूला ठेवा.
 
- प्रथम तव्यावर पोळी शेकण्याअगोदर त्यावर मीठ शिंपडा. असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही. तसेच, कोणत्याही पशू किंवा पक्ष्यांसाठी पहिली पोळी बनवा जेणेकरून घरात नेहमीच धान्य राहील.
 
- जेव्हा तवा थंड होईल तेव्हा त्यावर लिंबू आणि मीठ चोळा, शास्त्रानुसार, स्वच्छ आणि चमकदार तवा आपले नशीबही उजळवते.
 
- तवा किंवा कढईला कधीही स्क्रॅच करू नका. कोमट पाण्याने चिकट वस्तू स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. कढईत आणि तव्यात कधीही जेवण करू नका, असे केल्यानेही घराचे वास्तुदोष बिघडतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तुदोष दूर करण्यासाठी घराध्ये ठेवावा तांब्याचा पिरॅमिड