Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्नानगृह आणि शौचालय सोबत असण्याचे 5 नुकसान

स्नानगृह आणि शौचालय सोबत असण्याचे 5 नुकसान
, शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019 (16:57 IST)
--हल्ली घरात जागा कमी असल्यामुळे लेट--बाथ कॉमन असणे अगदी सामान्य झाले आहे. अटॅच लेट-बाथ म्हणजेच बाथरूम आणि टॉयलेट एकाच जागी असल्याने जागेचा पुरेपूर उपयोग होत असला तरी हे किती नुकसानदायक आहे या बद्दल अनेक लोकांना मुळीच कल्पना नसेल. तर वास्तु शास्त्राप्रमाणे जाणून घ्या याचे 5 नुकसान.
 
वास्तु दोष : वास्तु शास्त्राच्या नियमानुसार याने घरात वास्तुदोष उत्पन्न होतो. या दोषामुळे घरात राहणार्‍यांना अनेक प्रकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागतं.
 
1. मतभेद : या प्रकाराच्या दोषामुळे नवरा-बायको आणि कुटुंबाच्या इतर सदस्यांमध्ये मतभेद आणि वाद निर्माण होतात. यामुळे कुटुंबातील सदस्य घरात टिकत नाही.
 
2. ग्रहण योग : वास्तु शास्त्रात बाथरूममध्ये चंद्राचा वास आणि टॉयलेटमध्ये राहुचा वास असतो. जर चंद्र आणि राहू एका जागी एकत्र येतात तर ग्रहण योग बनतात. याने चंद्र दूषित होतो. चंद्राच्या दूषित झाल्यामुळे अनेक प्रकाराचे दोष उत्पन्न होऊ लागतात कारण चंद्र मन आणि पाण्याचा कारक आहे जेव्हाकि राहूला विष समान मानले गेले आहे ज्याने मेंदूवर प्रभाव पडतो. या युतीमुळे पाणी विष युक्त होतो ज्याच्या प्रभाव आधीतर व्यक्तीच्या मनावर आणि मग त्याच्या शरीरावर पडतो.
 
3. द्वेष भावना : चंद्र आणि राहुचा संयोग झाल्यामुळे मन आणि मस्तिष्क विषयुक्त होतं. ज्यामुळे लोकांमध्ये सहनशीलतेचा अभाव बघायला मिळतो. मनात एकमेकांप्रती द्वेष भावना वाढते.
 
4. अपघात : राहूचे दोष उत्पन्न झाल्यामुळे जीवनात अपघात होण्याची शक्यता वाढते. म्हणून घराचं टॉयलेट आणि जिना नेहमी स्वच्छ आणि दोषमुक्त ठेवावं.
 
5. धनाची हानी : जीवनात धनाची आवक गुरु आणि चंद्रामुळे होते. चंद्राने मनाची मजबुती होते आणि राहुचा सकारात्मक पक्ष हे आहे की त्याने कल्पना शक्तीचा स्वामी, पूर्वाभास आणि अदृश्य बघण्याची शक्ती मिळते. म्हणून दोन्ही खराब असल्यामुळे धनाची हानी तसेच मन आणि मस्तिष्क कमजोर होऊन जातं.
 
कसं असावं 
वास्तु शास्त्राच्या प्रमुख ग्रंथ विश्वकर्मा प्रकाश यानुसार ‘पूर्वम स्नान मंदिरम’ अर्थात घराच्या पूर्व दिशेत स्नानगृह असावं. दुसरीकडे याच ग्रंथामध्ये सांगितले गेले आहे की ‘या नैरृत्य मध्ये पुरीष त्याग मंदिरम’ अर्थात दक्षिण आणि नैरृत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेच्या मध्य पुरीष अर्थात मल त्याग करण्याची जागा असावी.
 
शौचालयाचे वास्तु नियम
जर चुकीने आपलं शौचालय ईशान कोणमध्ये बनलं असेल तर यामुळे अत्यंत धनहानी आणि अशांतीचे कारण बनू शकतं. प्रथमोपचार म्हणून त्याच्या बाहेर शिकार करत असलेल्या सिंहाचं चित्र लावावं. शौचालयात बसण्याची व्यवस्था दक्षिण किंवा पश्चिम मुखी असल्याच योग्य ठरेल.
 
स्नानघरासाठी वास्तु नियम 
स्नानघरात वास्तुदोष दूर करण्यासाठी निळ्या रंगाची बादली आणि लोटा वापरावा. स्नानघरात कोणत्याही प्रकाराची फोटो लावणे योग्य नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय