Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर आरामाची झोप हवी असेल तर करा वास्तूचे हे उपाय

जर आरामाची झोप हवी असेल तर करा वास्तूचे हे उपाय
, शनिवार, 15 जून 2019 (13:57 IST)
दिवसभर काम करून जेव्हा तुम्ही थकून जाता आणि रात्री तुम्हाला गाढ झोप हवी असते, पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात फारच कमी लोक असतील त्यांना गाढ झोप लागत असेल. जेव्हा लोक बिस्तरावर झोपायला जातात तेव्हा ते बर्‍याच प्रकारच्या गोष्टींचा विचार करू लागतात. ज्यामुळे त्यांची झोप मोड होते. वास्तू शास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहे ज्याला तुम्ही उशी खाली ठेवून झोपाल तर तुम्हाला चांगली झोप येते. तर जाणून घेऊ त्या कोणत्या गोष्टी आहे ज्याला तुम्ही उशी खाली ठेवल्याने गाढ झोप येते.
 
जर तुम्ही एखाद्या मोठ्या अडचणीतून जात असाल तर रात्री झोपताना उशी खाली मुळा ठेवून झोपावे. आणि तो मुळा सकाळी महादेवाला अर्पित करावा. असे केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. या उपायामुळे राहू दोष दूर होतो.  
 
उशीच्या खाली देवाला वाहिलेले फूल ठेवून झोपले तर मनाला शांती मिळते. आणि झोप देखील गाढ लागले. दुर्गा सप्तसतीचा पाठ करणे देखील फायदेशीर असते. यामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते.  
 
रात्री झोपताना आई वडिलांचे स्मरण करून झोपावे किंवा आपल्या कूल देवीला प्रणाम करून झोपल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होऊन तुम्हाला गाढ झोप लागते. 
webdunia

जर तुम्ही उशी खाली लोखंडाची एखादी वस्तू ठेवून झोपत असाल, तर तुम्हाला गाढ झोप येईल. असे मानले जाते की लोखंड ठेवल्याने आजू बाजू कुठलीही नकारात्मक ऊर्जा येत नाही. आमच्या घरात आम्ही लहान मुलांच्या आजू बाजूला एखादी लोखंडाची वस्तू ठेवतो, ज्याने मुलांना भिती वाटत नाही.  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वास्तूनुसार योग्य दिशेत लावा विजेचे उपकरण