वास्तू टिप्स : घरातील वडीलधारी मंडळी नेहमी जोडे, चप्पलांमुळे टोकत असतात. बहुतेक लोकांना त्यामागील तर्क माहित नाही. मात्र, वडीलधाऱ्यांनी टोकले की आम्ही लगेच चप्पल सरळ करतो. चला तर मग जाणून घेऊया चप्पल उलटी ठेवल्याने काय त्रास होऊ शकतो.
लक्ष्मी रागवते
असे मानले जाते की जर घरात उलटी चप्पल किंवा उलटे बूट असतील तर ते ताबडतोब सरळ करावेत, कारण यामुळे घरात भांडणे होऊ शकतात आणि देवी लक्ष्मीही रागवते. त्यामुळेच उलटलेली चप्पल ताबडतोब सरळ करावी असे मोठे लोकं सांगतात, त्यामागे कोणतेही शास्त्रीय तथ्य नाही.
घरामध्ये आजार, दुःख इत्यादी वाढतो
याशिवाय आणखी एक मत आहे की चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने घरामध्ये आजार, दुःख इत्यादी होतात. त्यामुळे चप्पल व बूट काढल्यानंतर चुकून उलटे झाले तर लगेच सरळ करा. चप्पल आणि शूज घरासमोर किंवा घरात उलटे ठेवल्याने घरात भांडण होऊ शकते, असेही मानले जाते. वृद्ध मंडळी सांगतात की, चप्पल आणि शूज कधीही उलटे ठेवू नका, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते.
विचारांवर वाईट परिणाम
घराच्या दारात विसरूनही चपला आणि जोडे उलटे ठेवू नयेत, अशीही श्रद्धा आहे. याचा घरातील सदस्यांच्या विचारांवर वाईट परिणाम होतो. वास्तूनुसार, शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने घरातील सकारात्मकता निघून जाते. त्यामुळे कुटुंबाच्या सुख-शांतीमध्ये खूप अडथळे येतात.
शनीचा प्रकोप कायम राहतो
असे मानले जाते की घरात शूज आणि चप्पल उलटे ठेवल्याने तणावाचे वातावरण निर्माण होते. तसेच चप्पल आणि शूज उलटे ठेवल्याने शनिदेवाचा प्रकोप राहतो, कारण शनिदेव पायांचा कारक मानला जातो.
( अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही. )