Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो?- चित्रा वाघ

chitra wagh
, मंगळवार, 26 एप्रिल 2022 (08:41 IST)
"कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करणे याला आमचा विरोधचं आहे, पण हनुमान चालिसाचे पठण करणे हा हिंदूस्थानात देशद्रोह कसा काय होऊ शकतो? तसेच महिलांबद्दल अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या मंत्र्यांचा मी निषेध करते. अशा लोकांचं महिला जोपर्यंत 'खेटरं पुजन' करणार नाही, तोपर्यंत यांचा मेंदू ठिकाण्यावर येणार नाही", असं शब्दात भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेवट्टीवार यांच्यावर टीका केली आहे.
 
यावेळी त्यांनी कुणाच्या घरावर जाऊन आंदोलन करण्याला आमचा विरोध असल्याचं म्हटलं. यातून त्यांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याकडून जाहीर झालेल्या मातोश्रीबाहेरील हनुमान चालिसा आंदोलनाला विरोध दर्शवला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाविकास आघाडीत शकुनीमामाचा सुळसुळाट- सदाभाऊ खोत