उदघाटनाआधीच समद्धी महामार्गाच्या नागपूर-शेलूबाजार टप्प्यातील एक कमान कोसळली आहे.या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाने पत्रकाद्वारे माहिती दिली आहे. या अपघातामुळे उदघाटन सोहळा दीड ते दोन महिने लांबणीवर गेला आहे.
महामार्गावर वन्यजीवांसाठी ओव्हरपास बांधण्यात आला आहे. त्यापैकी 16 क्रमांकाचा ओव्हरपासचा आर्च कोसळून अपघात झाला. हे काम पाच-सहा दिवसात होणं कठीण आहे. तज्ज्ञांनी वन्यजीव उन्नत मार्गासाठी नव्या पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर पद्धतीचे बांधकाम सुचवले आहे. त्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. नागपूर ते सेलूबाजार टप्प्याचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलावा लागेल असं चित्र आहे