"महाविकास आघाडी विकास कामांवर बोलायला तयार नाही. परंतु, एका शकुनीमामाकडून सतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचं काम होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्याची सेना कौरवाची सेना असते आणि आम्ही पांडवाची सेना आहे. आम्ही या कौरवांचा नाश करु", असं माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
'जागर शेतकऱ्यांचा आक्रोश बहुजनांचा' हे राज्यव्यापी अभियान 29 एप्रिल पासून कोकणातून सुरू करत असल्याची घोषणाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यात सध्या फक्त फालतुगिरी सुरू आहे. हे सरकार नोकर भरतीवर बोलत नाही. सरकारने आरोग्य भरतीमध्ये घोटाळा केला आहे. हे सर्व जनतेसमोर या अभियानातून मांडण्यात येणार असल्याचे खोत यांनी यावेळी सांगितले.