घर बांधताना चुकीने किंवा परिस्थितीमुळे काही वास्तुदोष राहून जातात. हे दोष निवारण्यासाठी योग्य उपाय केले तर तोडाफोड न करत ही तुम्ही वास्तुदोषांवर मात करू शकता.
1. घरातील सर्व प्रकाराचे वास्तू दोष दूर करण्यासाठी मुख्य प्रवेशदाराच्या एका बाजूला केळीचं झाड आणि दूसर्याबाजूला कुंड्यात तुळस लावावी.
2. स्वयंपाकघरासाठी दक्षिण-पूर्व हे सर्वोत्तम दिशा आहे. आणि उत्तर-पश्चिम दिशा यासाठी दुसरा पर्याय आहे. जर स्वयंपाकघर चुकीच्या जागेवर बांधलेलं असेल तर अग्निकोणात एक बल्ब लावून त्याला सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच जाळावे.
3. जर आपल्या घराच्या समोर स्तंभ, मोठं झाड, किंवा इमारत असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर किंवा आर्थिक स्थितीवर विपरित परिणाम होऊ शकतो. हे दोष असल्यावर आपल्या घरासमोर दिवा लावला हवा. हे शक्य नसल्यास घरासमोर अशोकाचे वृक्ष आणि कुंड्यात सुवासिक फुलांची झाडे लावावी.
4. बेडरूममध्ये बीम असल्यास त्याखाली आपला बेड लावू नये. बीमच्या खाली जेवणाचे टेबल ठेवणेदेखील योग्य नाही.
5. घरातील मुख्य प्रवेशदारासमोर कोणताही कोपरा येत असेल तर स्पॉट लाइट जाळावी. ज्याने आपल्या घरात प्रकाश येत राहील. या व्यतिरिक्त मध्ये उंच झाड लावावं.