Festival Posters

ज्या जागेवर घर बांधत आहे तो प्लॉट कसा असावा?

Webdunia
'उत्तम बांधकामासाठी प्लॉटचा आकार चौरस किंवा समचतुष्कोणीय असला पाहिजे. याने घरात सुख-समृद्धी नांदते. जर प्लॉट चतुष्कोणीय असेल तर त्याच्या लांबी रूंदीचे प्रमाण 10:2 असे असावे, परंतु या सीमेपलीकडे नसावे. 
 
त्रिकोणी प्लॉट शुभ असल्याचे मानण्यात येत नाही, कारण तशा प्रकारचा प्लॉट भागीदार आणि काम करणारे यांच्या वतीने अडच‍णींना निर्माण करणारा ठरू शकेल. 
 
अनियमित आकार नसलेले आणि बेढप प्लॉट बांधकामासाठी चांगले नसतात, कारण त्यातून आर्थिक हानी आणि मतभेदांना खतपाणी मिळण्याची शक्यता आहे. 
 
प्लॉटचा मध्य भाग भोवतालच्या भागाच्या तुलनेनी बसका असायला नको, नाहीतर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल. 
 
उत्तरोन्मुख किंवा पूर्वोन्मुख प्लॉट, दक्षिणोन्मुख किंवा पश्चिमोन्मुख प्लॉटच्या तुलनेन जास्त चांगले असतात.
 
जर प्लॉट एखाद्या डोंगरी भागात असेल तर उतरण पूर्व आणि उत्तर दिशेकडे असावी. 
 
कोणताही कालवा, तलाव, नदी, झरा, विहिर, डबके प्लॉटच्या उत्तरे किंवा पूर्वेस असावे. 
 
प्लॉटच्या उत्तरेस किंवा पूर्वेस एखादा मोठा वृक्ष नसावा. प्लॉटच्या दक्षिणेस किंवा पश्चिमेस एखादा खड्डा किंवा विहिर नसावी.
 
घराच्या दक्षिणेस वाट असली तर तीचे मुख्य द्वार दक्षिण किंवा आग्नेयेस असावे. मुख्य द्वार घराच्या ईशान्येस असावे. दुसरा कोणताच पर्याय नसल्यास पश्चिमेकडे असावे, परंतु स्वैपाक करताना तोंड दक्षिण दिशेकडे कालत्रयी नसावे. 
 
वेणीफणी करताना तोंड कधीही पूर्वेकडे अथवा पश्चिमेकडे नसावे. टॉयलेट्स सहसा दक्षिण, पश्चिम किंवा वायव्येस असावे. घर अशा रीतीने बांधवे की उत्तरेकडचा किंवा पूर्वेकडचा बराचसा भाग मोकळा असावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Christmas 2025 नाताळ स्पेशल भेट देण्यासाठी भारतातील टॉप पर्यटन स्थळे

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

आरती शुक्रवारची

आज रात्रभर शेवटचा सुपरमून दिसणार

समर्थ रामदास स्वामींना दत्त महाराजांचे दर्शन..

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments