Festival Posters

वास्तू टिप्स : आयुष्यात आनंद वाढेल, विश्वास बसत नसेल तर करुन बघा

Webdunia
बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (15:31 IST)
वास्तू शास्त्र हे खूप प्राचीन शास्त्र आहे. जुनी सभ्यता आणि देऊळ, जुन्या इमारतींमध्ये देखील याचा वापर दिसून येतो. जुन्या काळातील इमारती आणि देऊळात देखील वास्तू कलांचे आश्चर्यकारक नमुने बघायला मिळतात. वास्तुशास्त्रात प्रत्येक दिशानिर्देश आणि बांधकामासाठी काही न काही नियम दिले आहेत. कधी-कधी वास्तुकडे दुर्लक्ष करून आपल्याला बऱ्याच अडचणींना सामोरी जावं लागतं. म्हणून वास्तू लक्षात ठेवून काही करावं. वास्तुमध्ये काही उपाय सांगितले आहेत जे केल्यानं आपण आपल्या आयुष्याला आनंदी करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या वास्तूचे ते सोपे उपाय.
 
* घरात दररोज देवाची पूजा करून धूप आणि निरांजन ओवाळावी. या मुळे घरातील वातावरण सकारात्मक होतं. पूजा करताना तोंड नेहमीच पूर्वीकडे किंवा उत्तरेकडे असावं. संध्याकाळच्या वेळी घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिवे लावावे. कारण अंधाऱ्याला वाईट आणि नकारात्मक शक्तींचे घटक मानले जाते.
 
* घरात तुटलेल्या किंवा खराब वस्तू ठेवू नये. खराब आणि बंद पडलेल्या घड्याळीला लगेचच दुरुस्त करवावे किंवा जुनी घड्याळ काढून नवी घड्याळ लावावी. कारण घड्याळ ही काळाची सूचक आहे. म्हणून बंद घड्याळ योग्य मानली जात नाही.
 
* घरात सकारात्मकता आणण्यासाठी मुख्य दारावर दोन्हीकडे स्वस्तिक आणि शुभ-लाभ चे चिन्ह बनवावे. स्वस्तिकचे चिन्ह शुभ मानले आहे. याला मुख्य दारावर बनवल्याने घरात शुभता राहते.
 
* घरात तुळशीचं रोपटं लावावं. तुळस वास्तू दोषाच्या परिणामांपासून संरक्षण करते. दररोज सकाळ, संध्याकाळ तुळशीत पाणी घातल्यानं आणि साजूक तुपाचा दिवा लावल्यानं आई लक्ष्मीची कृपा मिळते.
 
* घरात जेवण बनवताना, प्रथम थोडं अन्न वास्तू देवांसाठी काढून ठेवावं. त्यानंतरच घरातील सदस्यांनी अन्न ग्रहण करावं. वास्तू देवासाठी काढून ठेवलेलं अन्न नंतर गायीला खाऊ घालावं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Amalaki Ekadashi 2026: आमलकी एकादशीचे व्रत कधी पाळले जाते आणि त्याचे महत्त्व काय?

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

ऑफिसमध्ये प्रतिकूल परिस्थिती असल्यास आमलकी एकादशीला हे करा

Buy these items on friday शुक्रवारी खरेदी करा या वस्तू

Holi 2026: लाठमार पासून ते फूल होळीपर्यंत, भारतात किती प्रकारे होळी साजरी केली जाते? जाणून घ्या खास परंपरांबद्दल

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

पुढील लेख
Show comments