Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पृथ्वीची गरूत्वाकर्षण शक्ती

- डॉ. सुधीर पिंपळे

Webdunia
MH GovtMH GOVT
पृथ्वी एखाद्या चुंबकाप्रमाणे गुणधर्म दाखविते. पृथ्वीचा गुरूत्वीय मध्य हा तिच्या आत केंद्रस्थानी असून तिचे चुंबकीय क्षेत्र दोन ध्रुवांपर्यंत सारखे आहे. पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षण शक्तीचा माणसावर फार मोठा परिणाम होतो. त्यामुळेच वास्तुशास्त्रात चुंबकीय क्षेत्राचा विचार केला जातो. त्यामुळे त्यातील सर्व नियम हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी निगडीत आहेत. माणसाचे डोके हे उत्तर ध्रुवाचे काम करते. शास्त्रज्ञ पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा विचार करतात.

मात्र, त्यांना त्यापासून उत्पन्न होणारी कोणती ऊर्जा माणसाला कशी फायदेशीर आहे याचे ज्ञान नाही. पण आपल्या ऋषीमुनींनी आपल्या हजारो वर्षांच्या अनुभवाच्या सहाय्याने याचा शोध लावला आहे. म्हणूनच घरबांधण‍ीपूर्वी जमीन त्याची दिशा याचा विचार प्राधान्याने करावा लागतो. कारण जमीन हे एक पृथ्वीचेच रूप आहे. जमिनीचा आकार, प्रकार त्याच्याशी निगडीत दिशा, झाडे, पाणीसाठा या बरोबरच जमिनीची ऊर्जा, गुरूत्वीय तसेच केंद्रीय बल व पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी याही गोष्टींचा परिणाम होतो. म्हणून वास्तुशास्त्रात सांगितले आहे, की झोपताना माणसाचे डोके उत्तरेला असू नये कारण पृथ्वाच्या उत्तर ध्रुवाप्रमाणे माणसाचे डोके हा उत्तर ध्रुव (मानवी शरीराचा) आहे. त्यामुळे समान ध्रुव एकमेकांना प्रतिकर्षित करतात.

' similar poles replac each other' या नात्याने माणसाचा रक्तदाब वाढणे, झोप न लागणे, तणाव या सारखे त्रास संभवतात. वास्तुशास्त्रातले सर्व नियम पृथ्वीची ऊर्जा, चुंबकीय क्षेत्र, तिचे तापमान, पृथ्वीवर पडणार्‍या केंद्रीय बलांच्या परिणामावर आधारावर ठरविले आहेत. कारण आत्तापर्यंत तरी घरबांधणी पृथ्वीवरच शक्य झाली आहे. ज्या जमिनीवर घर बांधले जाते त्यावर 35 प्रकारच्या ऊर्जा असतात ज्याला वास्तुपुरूषाचे मंडळ म्हणतात त्यात काही पॉझिटिव्ह तर काही निगेटिव्ह एनर्जी असतात.

सूर्यापासून ग्रहांची अंतर े

बुध -- 57,900,000 कि.मी.
शुक्र -- 108,200,000 कि.मी.
पृथ्वी -- 147,500,000 कि.मी.
मंगळ -- 227,700,000 कि.मी.
गुरू -- 778,300,000 कि.मी.
शनी -- 1427,000,000 कि.मी.
अरूण (युरेनस) -- 2889,600,000 कि.मी.
वरूण (नेपच्यून) -- 4496,600,000 कि.मी.
कुबेर (प्लूटो) -- 5900,000,000 कि.मी.

बुध व शुक्राला उपग्रह नाही. मंगळाला 2, पृथ्वीला 1, गुरूला 13, शनीला 10, युरेनसला 3, व नेपच्युनला 2 उपग्रह (चंद्र) आहेत.

( अनुवाद- सौ. भाग्यश्री कुलकर्णी)
सर्व पहा

नवीन

शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments