Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुसाठी जमिनीची निवड

- डॉ. सुधीर पिंपळे

Webdunia
कोणत्याही प्रकारचे घर बांधण्यासाठी जमिनीची निवड करणे आवश्यक आहे. असे म्हटले जाते, की ज्या घरची गृहलक्ष्मी सुखी असते ते घर सुखी राहते. त्याप्रमाणे जर घराची जमीन चांगली असेल तर घर सुखी असते. म्हणून वास्तुशास्त्रानुसारच जमीन निवडावी. जमिनीचा आकार, प्रकार, त्याच्या दिशा, चुंबकीय क्षेत्र चढउतार, रस्ता, परिसर या बरोबरच घर बांधण्याचा उद्देश, मालकाचा वर्ण, जन्म नक्षत्र, पत्रिकेवरचे योग यानुसारच जमीन निवडावी.

जमिनीचे प्रकार -
' समरांगण सूत्रधार' या ग्रंथात वेगवेगळ्या देशांनुसार जमिनीचे प्रकार केले आहेत. देशात जमिनीचे तीन प्रकार सांगितले जातात.

जंगल :-
ज्या देशात पाणी लांब आहे, वाळू रेती जास्त आहे, वनस्पती जास्त आहेत. काटेरी वनस्पती आहेत वारे कोरडे, गरम व जोरात वाहतात ज्याची माती काळी आहे अशा देशाला जंगलदेश म्हणतात.

अनुप :-
जिथे पाणी मुबलक आहे. नदी-नाले मोठ्या प्रमाणावर आहेत. मासेमास उपलब्ध आहे जिथे सुंदर व उंच वृक्ष आहेत त्या प्रदेशाला अनुप देश म्हणतात.

साधारण :-
ज्या देशात वरील दोन्ही लक्षणे दिसतात आणि जिथे जास्त गरमही नाही थंडही नही पाणी पण साधारण आहे अशा प्रदेशाला साधारण देश मानले आहे.

' समरांगण सुत्रधारा'नुसार वरील तीन लक्षणांनी युक्त 16 प्रकारची जमीन सांगितली आहे.
1. वालिया स्वामित्व 2. भोग्या 3. सीतागोचर रक्षिणी 4. अपाश्रयली 5. कान्ता 6. सीमन्ती 7. आत्मधारणी 8. वणिक प्रसादिता 9. द्रव्यवन्ति 10. अमित्र अन्तिनी 11. श्रावणीपुष्य 12. शक्य सामन्ता 13. देशमातुका 14. धान्यशालिनी 15. हस्ती कनोपेन 16. सुरक्षा.

मातीचे गुण :-
जमिनीला वरील सर्व उपाध्यांप्रमाणेच आणखी चार वैदिक वर्ण प्रकारात विभागले आहे त्याच्यावरील मातीचा गुणधर्म रंग, गंध आणि स्वादाच्या आधारे, वैदिक व्यवस्थेत बनवलेल्या वर्णाच्या ठरवलेल्या कर्माच्या आधारे केलेले महत्त्व आजही आहे कारण त्या घराचा उद्देश तसेच बनवणारा कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर जमिनीची निवड घरमालकाचे जन्म नक्षत्र, पत्रिकेचा मूळ योग तसेच व्यवसायाच्या अनुसार केली पाहिजे. मातीचे 4 गुण पुढीलप्रमाण े

ब्राह्मण :-
ही माती, विद्वान, धार्मिक कार्य, शिक्षण तसेच याचप्रकारच्या व्यवसायासाठी उपयुक्त आहेत ज्यात बुद्धीचा वापर अधिक आहे. अशी माती सुगंधी, गोड व पांढर्‍या रंगाची मानली जाते.

क्षत्रिय :-
अशी माती शासन, प्रशासन, सेना (लष्कर) यांच्याशी संबंधित व्यक्तींसाठी किंवा याच्याशी संबंधित संलग्न उद्योगांशी संबंधित व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. ही माती लाल रंगाची, रक्तगंधीत व तिखट स्वादाची आहे.

वैश्य :-
ही माती उपजत व्यापाराशी संलग्न व्यक्ती विशेषतः: खरेदी-विक्री करणार्‍या व्यापारर्‍यांसाठी उपयुक्त आहे. ही हिरव्या-निळ्या रंगाची, अन्नाच्या वासाची, आंबट स्वादाची माती आहे.

शूद्र :-
ही माती लोखंड, चामडे आदी व्यवसायाशी संबं‍िधत लोकांसाठी उपयुक्त आहे. ही काळी, कडू व मदिरागंधाची असते.
ज्योतिषशास्त्रानुसार विश्लेषण केल्यास ब्राह्मण गुण धर्माची माती गुरु ग्रहाच्या नक्षत्रांच्या, गुरुच्या राशीच्या - धनु आणि मीन तसेच गुरुच्या प्रभावाखालील व्यक्तींना लाभदायक आहे.

क्षत्रिय गुणाची माती मंगळ ग्रहाची नक्षत्र, राशी, मेष आणि वृश्चिक तसेच मंगळ प्रभावित व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.
शूद्र गुणाची माती शनीची नक्षत्रे, राशी -कुंभ आणि मकर तसेच शनीच्या प्रभावाखालील व्यक्तींसाठी उपयुक्त आहेत.
सूर्य, चंद्र, शुक्र तसेच वृषभ, कर्क, सिंह व तूळ राशींचा विचार त्यांच्या मित्र ग्रहाच्या आधारे करावा.

( सूचना : हे एक ढोबळ विवेचन आहे. जमीन निवडताना जमीन मालकाच्या जन्म नक्षत्र व पत्रिकेच्या मुळयोगांवरून व दशेवरून गाह्य धरावी.)

मातीची चव : -
गोड मातीवर राहणारे आनंद व समृद्धी मिळवतात. तिखट माती शौर्य-वृद्धी करते. तुरट व खराब स्वादाची माती दारिद्र्य आणते.

मातीच्या रंगाची शुभ अशुभता :-
* काळी, पिवळी, पांढरी किंवा तांबडी माती घर किंवा कारखान्यासाठी योग्य असते.
* लाल रंगाच्या मातीवरील कोणत्याही वास्तुला फळ मिळत नाही.
* हिरव्या मातीवर काही बांधू नये.
* सोनेरी (आगीच्या रंगाची) जमीन प्रतिकूल असते तर
* सर्व प्रकारची, दुर्गंधी असणारी काळी माती दारिद्र्य आणते.

मातीची पाठणी :-
अशी जमीन जी कोनात आहे म्हणजे तिचे तोंड उपदिशांच्या कोनात असेल तर ती घेऊ नये. जमीन आपल्याला लाभदायक आहे याचे अनुमान मातीवरून करता येते अर्थात जमीन निवडताना आमच्या पूर्वजांनी सांगितले आहे की,

मनसश्रचक्षुषार्यम सन्तोषो जय्यते भूवि।
तस्यां कार्य गृह: सर्वेशिर्स गर्गादी सम्मतम्।।

ज्या जमिनीवर जाताच मन व डोळे प्रसन्न होतात त्यावर घर बांधुन निवास करावा असे गर्ग आदि ऋ‍षींचे म्हणणे आहे. पूर्वी भूमिपरीक्षण सोपे होते, ती जमीन खोदल्यावर मिळणार्‍या वस्तूंच्या आधारे त्याचे शुभाशुभ महत्त्व ठरवले जात असे पण हल्ली वैधानिक व शास्त्रीय या दोन्ही पद्धतीचा फायदा घेऊन आपण पुढील प्रकारे परीक्षण करू शकतो.

1. दोन फुटाचे दोन खड्डे करून एकातली माती दुसर्‍यात भरा. जर माती पूर्ण भरून वर उरली तर जमीन ऐश्वर्यवान आहे. जर खड्डा भरला आणि माती उरली नाही तर ती सामान्यपणे शुभ आहे आणि खड्डा पूर्ण भरला नाही तर ती अशुभ आहे.
2. दुसर्‍या खड्यात पाणी भरा जर ती माती पाण्याला तासभर किंवा त्यापेक्षा जास्त वेळेत शोषून घेत असेल तर ती जमीन चांगली नाही असे समजा.
3. जमिनीला एकफुट खोदून वास घ्या जर तेलकट किंवा इतर सुगंधी वास येत असेल तर ती जमीन अती उत्तम मानली जाते.
4. जमीन खोदल्यावर जर दगड निघाला तर ती जमीन धन आणि आयुष्य वाढवणारी आहे. विटेचा तुकडा मिळाला तरी धनवृद्धी होते.
5. जमीन खोदल्यावर जमिनीमध्ये अजगर, भूसा, हाडे, भस्म, राख, साप मिळाले तर जमिनीची खरेदी चांगली नाही असे समजावे. 
सर्व पहा

नवीन

शनिवारी सकाळी ह्या तीन वस्तू दिसणे म्हणजे शुभ संकेत असते

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments