Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फक्त एक ग्लास पाण्याने दूर करा घरातील निगेटिव्ह अॅनर्जी

Webdunia
तुमच्या घरात सारखे नकारात्मक काही घडत आहे, ज्यामुळे भांडण, नुकसान, आजारपण सतत घरात सुरूच आहे. तर तुम्हाला 1 ग्लास वॉटर टेस्ट करून हे अवश्य बघायला पाहिजे की तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तर नाही आहे.  
 
जेव्हा घरातील सदस्य किंवा पाळीव जनावर असामान्य व्यवहार करू लागतात, कारण नसताना देखील तुमचा पैसा खर्च होत असेल, मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ लागतात आणि रोपटे आपोआप वाळू लागतात तर या गोष्टींचे संकेत आहे की तुमच्या घरात  नकारात्मक ऊर्जा पसरली आहे. नेहमी लोक अशा परिस्थितीत घाबरून जातात आणि घाई गडबडीत चुकीचे निर्णय घेऊन घेतात जसे घर सोडून देणे किंवा परत घर तयार करणे, पण याने काहीही फायदा होत नाही.  
 
हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात घरातील कोपर्‍यांमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे उपाय सांगण्यात आले आहे.  
 
नेगेटिव वाइब्रेशन हे काय आहे, आधी हे तुम्हाला जाणून घ्यावे लागेल - नकारात्मक ऊर्जा कधीही तुमच्या व्यक्तिगत स्थानावर  आक्रमण करू शकते. त्या तुम्हाला किंवा तुमच्या घराच्या चारीकडे नकारात्मकता निर्माण करून घेते. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे जीवनात तुम्हाला तेच मिळत जे तुम्ही देता.  
 
सकारात्मक वस्तूंना गमवायला लागता : याचा अर्थ काही चुकीच्या निर्णयांमुळे तुम्हाला नुकसान होऊ लागत. जसे चुकीच्या जागेवर गुंतवणूक करणे, तुमच्या मुलांना चुकीची संगत लागणे. यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला निगेटिव्ह अॅनर्जीचा शोध लावणे फारच गरजेचे आहे.  
 
ग्लास वॉटर टेस्ट : फक्त एक ग्लास पाण्याने तुम्ही पत्ता लावू शकता की खरंच तुमच्या जवळ एखादी नकारात्मक ऊर्जा आहे की नाही. आणि जेव्हा ह्या गोष्टीचा पत्ता लागतो तेव्हा हे निश्चित होऊन जात आणि त्यांना दूर करण्याचे उपाय करू शकता. येथे आम्ही काही उपाय सांगत आहोत ज्याने तुम्ही निगेटिव्ह अॅनर्जीहून मुक्ती मिळवू शकता.  
 
हे आहे उपाय : यासाठी तुम्ही एक असा पारदर्शी ग्लास घ्या जो कुठूनही तुटला नसेल, त्यावर एकही निशाण किंवा फिंगरप्रिंटही नसावा. पूर्ण वेळ ग्लव्स घालून राहावे ज्याने ग्लासवर तुमची कोणतीही ओळख दिसायला नको. आता ग्लासमध्ये 1/3 भागात सी सॉल्ट (मिठाचे गडे) भरा. फक्त सी सॉल्‍टचा वापर करावा सादे मीठ नव्हे. ग्लास 2/3 भागात पांढरा सिरक्याने भरावा. लक्षात ठेवायचे म्हणजे यांना आपसात मिक्स नाही करायचे. आता ग्लासमध्ये उरलेल्या भागात स्वच्छ पाणी टाकावे. ग्लासच्या पदार्थांना आपसात मिक्स नाही करायचे.  
 
जागा शोधून आता ग्लासला त्या जागेवर घेऊन जा जेथे तुम्हाला नकारात्मक ऊर्जेचा जास्त अनुभव होत असेल. जेव्हा तुम्ही ती जागा शोधून घ्याल तेव्हा तुम्ही अशी जागा शोधा जेथे तुम्ही ग्लास लपवू शकता. लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे हे सर्व दिवसा करायला पाहिजे. ग्लासला योग्य ठिकाणी लपवा. याला पलंगाच्या बाजू, मुलांच्या स्टडी टेबलला जवळ किंवा डायनिंग टेबलाजवळ ठेवू नये.    
 
ग्लास किंवा पाण्याच्या रंगात बदल बघण्यासाठी पुढील 24 तासांपर्यंत याला हात लावू नये. याला मुलांपासून दूर ठेवावे. 24 तासानंतर ग्लासचा तपास घ्या. जर पाणी आणि पदार्थ स्वच्छ दिसत असतील तर काही काळजीचे कारण नाही. पण ग्लासमधील पदार्थ अस्पष्ट किंवा हलक्या हिरव्या रंगाचे झाले असेल तर घरातील इतर भागांमध्ये देखील ही प्रक्रिया करावी.  
 
बदलांवर लक्ष ठेवा जर या प्रकारांचे बदल दिसत असतील तर तुम्हाला घराला री-एनर्जाइज़ (परत भरणे) करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही वास्तुशास्त्र किंवा फेंगशुईची मदत घेऊ शकता ज्याने तुम्ही तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जेला दूर करून    सकारात्मक ऊर्जेने भरू शकाल.
सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी प्रसिद्ध प्राचीन जुने कॅथोलिक चर्च भोपाळ

श्री सूर्याची आरती

Bhanu Saptami 2024 भानु सप्तमीच्या दिवशी काय केले जाते?

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

पुढील लेख
Show comments