वास्तुशास्त्राचे मूलतत्व पृथ्वी आहे. वेदात पृथ्वीला स्वर्णगर्भा, रत्नगर्भा म्हटले आहे कारण तिच्या पोटात असणारी सोने, चांदी, हिरे माणकादी रत्ने, वनस्पती औषधी रसायने व खनिजे माणसाला आवश्यक व त्याच्या दैनंदिन भूकेची गरज भागवून त्याला सुखी करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे पृथ्वी म्हणजे नेमके काय ते जाणून घेऊया....
सूर्यापासूनचे पृथ्वीचे अंतर व आकार
इतर ग्रहांप्रमाणेच पृथ्वी एक ग्रहच आहे. तिच्यापासून सूर्याचे अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटर किंवा 9 कोटी 29 लाख 65 हजार मैल दूर आहे. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार परिभ्रमण करते. तिचा व्यास अंदाजे 12 हजार 800 किलोमीटर म्हणजेच आठ हजार मैल आहे. पण ती गोल नसून दोन्ही धृवावर थोडीशी (जिआँइड) चपटी आहे. त्यामुळे तिचा धृवीय व्यास 12 हजार 640 किलोमीटर (7,926.6 मैल), जो धृवीय व्यासाच्या 43.2 किलोमीटरने (27 मैल) जास्त आहे. व्यासानुसार तिचा विषुववृत्तीय परिघ 39,776 कि. मी. (24,902 मैल) तसेच धृवीय परीघ 39,843 कि.मी. (24,860 मैल) आहे. त्या दोहोतील फरक 67 कि. मी. आहे. तिचे क्षेत्रफळ 55 कोटी 33लाख कि. मी. (19 कोटी 70 लाख मैल) आहे. ज्यात 36 कोटी 35 लाख कि.मी. (जल-भाग) पाणी आहे. तर जमीन फक्त 15 कोटी 98 लाख कि. मी. आहे. संपूर्ण पृथ्वीचे घनफळ 10 खर्व 63 अब्ज घन कि. मी. आहे. (10 अब्ज 63 दशलक्ष घन कि. मी. आहे.) तिची घनता 5.5 आहे. तिचे वजन 161022 मण 56,700 चा 15 वा घात टन आहे. तिची escape velocity 7 मैल (11.2 कि.मी.) प्रती सेकंद आहे. म्हणजे एखादी वस्तू 7 मैल प्रती सेकंद या वेगाने फेकली गेली तरच ती पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या बाहेर निघून जाऊ शकेल.
पृथ्वीचे तापमान
पृथ्वीवर सर्वांत जास्त तापमान 59 डिग्री सेल्सिअस (136 डिग्री F) तर सर्वात कमी तापमान दक्षिण धृवाजवळ -37 डिग्री F एवढे मोजण्यात आले आहे. पृथ्वीच्या क्रेंद्रस्थानी (पृथ्वीच्या जसजसे आत जावे) तापमान वाढत जाते आहे. जर अशा रितीने तापमान वाढत गेले तर क्रेंद्रातील तापमान 2.25 लाख डिग्री सेल्सिअस होईल. पृथ्वी स्वयंप्रकाशित नाही. तिला सूर्यापासून प्रकाश मिळतो (परप्रकाशी) आणि ती पुन्हा परावर्तितही करते.
पृथ्वीची गती
पृथ्वीच्या दोन गती आहेत. एक स्वत:भोवती फिरणे (परिवलन), सूर्याभोवती फिरणे (परिभ्रमण). पृथ्वी 23 तास 56 मिनिटे व 4.09 सेकंदात एक परिवलन पूर्ण करते यालाच तिची दैनिक गती (एक दिवस) एक आवर्तन म्हणतात. स्वत:भोवती फिरता फिरताच ती 365.25 दिवसात म्हणजेच 365 दिवस 5 तास 48 मिनिट व 46.09 सेकंदात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. यालाच पृथ्वीची वार्षिक गती (एक वर्ष) किंवा परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी ज्या मार्गाने परिभ्रमण करते त्याला (त्या मार्गाला) पृथ्वीची भ्रमणकक्षा म्हणतात. ही कक्षा 93 कोटी 54 लाख कि.मी. (58 कोटी 46 लाख मैल) आहे. त्यावर पृथ्वी एक लाख कि. मी. प्रती तास किंवा 29 कि. मी. प्रती सेकंद या वेगाने 365.25 दिवसात ती एक फेरी पूर्ण करते.
शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे, की पृथ्वीची ही परिभ्रमण गती नेहमीच सारखी नसते. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर सुरूवातीच्या काळात ती सूर्याच्या जास्त जवळ होती. ती जवळजवळ 15 हजार वर्षे चार तासातच एक परिवलन (स्वत:भोवती) पूर्ण करत असे. तसेच तिचा परिवलनाचा वेळही कमी होता. शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, दिवसेंदिवस पृथ्वी सुर्यापासून लांब जात आहे. त्यामुळे तिची फिरण्याचा कालावधी वाढतो आहे. पृथ्वी सुर्यापासून दरवर्षी एक सें.मी. (0.375 इंच) दुर जात आहे. त्यामुळे तिची गती एक लाख वर्षात एका सेकंदाने कमी होत आहे. म्हणजेच दिवसाचा कालावधी वाढतो आहे. पृथ्वीचा आकार, तिचे आकारमान, तिची भ्रमणगती या सर्वांविषयी माहिती करून घेण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली.
वेळोवेळी मनुष्याने आपल्याजवळ असणार्या तुटपुंज्या यंत्रणेची (साधनांच्या) मदतीने पृथ्वीची जी व्याख्या सांगितली आहे त्यावरून हेच दिसून येते की माणसाला ह्याविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता होती. जाणून घेण्याची ही जिज्ञासा दिवसेंदिवस वेगवेगळ्या वैज्ञानिक साधनांनी अधिकच तीव्र होते आहे. तरीही पृथ्वीवरील कितीतरी रहस्ये उलगडायचीच आहेत.
पृथ्वीच्या गोलाकाराचे महत्त्व
पृथ्वीच्या गोलाईचे माणसासाठी खास महत्त्व आहे. ह्या गोलाईमुळेच वेगवेगळ्या अंक्षांशावर सूर्याची किरणे वेगवेगळ्या अंशाच्या कोनात पडतात. विषूववृत्तावर ती जास्त लंबरूप पडतात, तर दोन्ही ध्रुवांकडे जाताना ती तिरपी होत जातात. त्यामुळे विषुववृत्तावरील जागी तापमान जास्त असते व ध्रुवावर ते कमीकमी होत जाते. तापमानाच्या फरकामुळेच कमी जास्त वायुदाबाचे पट्टे तयार होतात. त्यामुळेच वारे वाहतात. पाऊस पडतात. त्यामुळेच वेगवेगळ्या ठिकाणची पिके वेगवेगळी असतात. पाऊस पाण्याच्या फरकामुळे माणसाचे राहणीमान, पोशाख, खाण्यापिण्याच्या सवयी, रिती-भाती, धर्म, संस्कृती, परंपरा यातही विविधता आहे. लोकसंख्येची घनता व वाढही यावरच अवलंबून आहे. जर पृथ्वी चपटी असती तर हा सर्व वेगळेपणा दिसला तर नसताच पण पृथ्वीवर माणसाचे अस्तित्त्वच राहिले नसते. आणि ही पृथ्वी एक वैराण वाळवंटच बनली असती.