Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वास्तुप्रमाणे चिमुरड्यांची खोली

Webdunia
मुलांची पावले घरात पडल्याशिवाय घराला चैतन्य येत नाही. मुलं म्हणजे निखळ हास्य, चैतन्य व उत्साहाचे झरे. त्यांच्या वास्तव्याने घर न्हाऊन निघते. लहान मुलांच्या गरजा, आवडी-निवडी, छंद लक्षात घेऊन त्यांच्या खोलीची रचना करावी लागते. संस्कारक्षम वयातील लहान मुलांच्या कोवळ्या, संवेदनशील मनावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे घटनांचे रोपण होत असते.

लहान मुलांची खोली सजविताना सर्व गोष्टी दृष्टीकोनातून विचार करून निर्णय घेणे गरजेचे आहे. लहानग्यांच्या खोलीतील फर्निचर निवडताना विशेष काळजी घ्यावी. त्यांच्या फर्निचरला टोकदार, अणकुचीदार भाग, कोपरे राहणार नाहीत, अशाप्रकारे डिझाइन करावेत. त्यांच्या खोलीत भिंतीवर आवडते प्राणी, पक्षी, खेळाडू व निसर्गचित्रे असणारे वालपेपर्स लावल्यास एकदम छान. यामुळे मुलांच्या मनांची जडण-घडण समृद्ध होण्यास मदत होते.

मुलांचे अभ्यासाचे टेबल आरामदायक असावे. जेणेकरून अभ्यासाची गोडी निर्माण होईल. वास्तुशास्त्राचा आधार घेऊन त्यांच्या खोलीचे नियोजन केल्यास लाभासोबतच आत्मिक समाधानही लाभेल. लहानग्यांची खोली घराच्या वायव्येस ठेवणे लाभदायक ठरते. पूर्व दिशा उर्जेचे उगमस्त्रोत असल्याने दरवाजा पूर्वेकडे ठेवणे हितावह असते.

खोलीतील रंगसंगती लहान मुलांना प्रसन्न करणारी असावी. त्यांच्या खोलीची रंगरंगोटी नारंगी रंगाने केल्यास शुभ शक्ती कार्यरत होण्यास मदत होते. त्यांचा आवडता अभ्यासाचा टेबल सहसा भिंतीला चिटकवून न ठेवल्यास बरे. सरस्वती व गणपती या देवता विद्या व बुद्धीमत्तेच्या प्रतीक असल्याने त्यांचे चित्र मुलाचे खोलीत जरून लावावे. पलंगाची योजना करताना डोके दक्षिणेकडे असेल याची खात्री करून घ्यावी.

झोपेत शरीराचे चुंबकत्व कायम राखण्यासाठी याची मदत होते. पुस्तके ठेवतानाही जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे ठरते. पुस्तके सहसा नैऋत्य किवा पश्चिमेस ठेवणे योग्य. मुलांच्या टेबलावर अनावश्यक पुस्तकांची गर्दी करण्यात काही अर्थ नाही. आवश्यक ती व तेवढीच पुस्तके तेथे ठेवावीत. पुस्तकांची गर्दीमुळे मुलांच्या मनावर अनावश्यक दडपण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रात्रीचा अभ्यास करताना मुले टेबल लॅम्पचा वापर करीत असतील तर लॅम्प टेबलाच्या आग्नेय दिशेकडे ठेवणे पसंत करावे. खोलीत सहसा मोठे घड्याळ लावावे. दोलनाच्या घड्याळाने मुलांच्या एकाग्रतेत वाढ होण्यास मदत होते. शिवाय मुलांच्या खोलीत दोलनाचे घड्याळ असणे शुभकारक समजले जाते. मुलांची खोली घराच्या ईशान्य किवा वायव्येस असणे शुभ असते.

पुस्तकांचे कपाट पश्चिमेस ठेवावे. आरसा चांगल्या दर्जाचा, मजबूत व टिकावू असावा. आरसा नेहमी उत्तर किवा पूर्व दिशेच्या भिंतीवर लावावा. विजेच्या दिव्यांची बटणं मुलांचा हात पुरेल अशी योजना करून लावावी. इलेक्ट्रीकचे साहित्य उत्तम दर्जाचे व सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. त्यांचे बेड जवळच घरात संपर्क करण्यासाठी टेलिफोनची व्यवस्था केल्यास अगदी झक्कास! खेळाचे साहित्य ठेवण्याकरिता विशेष व्यवस्था करावी.

मुलांना स्पर्धांमध्ये मिळणारी बक्षिसं, ट्रॉफी ठेवण्याकरिता खास शेल्फची व्यवस्था करावी. अशा गोष्टी त्यांना सतत प्रेरणा देत असतात. भिंतींच्या रंगसंगतीसोबतच खिडक्या, दारांचे पडदे निवडताना खोलीतील रंगसंगती व मुलांची आवड लक्षात घ्यावी.

मुलांचे मन सर्जनशील असते. दररोज नवीन अनुभव त्यांच्या गाठिशी जमा होत असतात. मुलांची कला, कौशल्य मुक्तपणे अभिव्यक्त होण्याकरिता त्यांच्याशी उत्तम संवाद ठेवण्यासोबतच ड्रॉइंग बुक, पेन्सिल, स्केच बुक, रंगाच्या काड्या, फळा, पेन इत्यादी साहित्य त्यांच्या खोलीत असावयास हवे.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Maa Baglamukhi Mantra तिन्ही लोकात शक्ती देतं माँ बगलामुखीचा मंत्र

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पुढील लेख
Show comments