वास्तू शास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहे, ज्याच्या माध्यमाने व्यवसायात प्रगती होऊ शकते. दुकानाचा रंग जर व्यवसायानुकूल असेल तर फारच लवकर प्रगती होते आणि यश मिळणे सुरू होते. वस्तूनुसार कोणत्या व्यवसायासाठी दुकानात कोणता रंग लावायला पाहिजे, हे जाणून घ्या.
1. जर तुमचे ज्वेलरीची दुकान असेल तर तुम्हाला तुमच्या दुकानात गुलाबी, पांढरा किंवा हलका निळा रंग लावायला पाहिजे. त्याने तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल.
2. जर तुमचा किराणाचा व्यवसाय असेल तर तुम्हाला तुमच्या दुकाना हलका गुलाबी, हलका निळा किंवा पांढरा रंग लावणे शुभ ठरेल.
3. रेडीमेड गारमेंट किंवा इतर प्रकारच्या वस्त्रांच्या दुकानात हिरवा, हलका पिवळा किंवा हलका निळा रंग लावायला पाहिजे.
4. जर तुमची इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक्सची दुकान असेल तर तुम्हाला पांढरा, गुलाबी, हलका निळा किंवा हलका हिरवा रंग लावायला पाहिजे.
5. लायब्रेरी किंवा स्टेशनरी शॉपमध्ये पिवळा, हलका निळा किंवा गुलाबी रंग लावायला पाहिजे. यामुळे तुमचा व्यवसाय उत्तम चालण्यास मदत मिळेल.
6. मेडिकल, क्लिनिक किंवा इतर कोणत्या चिकित्सेशी संबंधित संस्थान असेल तर त्यासाठी गुलाबी, हलका निळा किंवा पांढरा रंग शुभ असतो.
7. जर तुमचे गिफ्ट शॉप किंवा जनरल स्टोअर असेल तर त्यासाठी हलका गुलाबी, पांढरा, पिवळा किंवा निळा रंग लकी असेल.
8. ब्युटी पार्लरमध्ये पांढरा किंवा हलका निळा रंग लावणे शुभ राहील.