Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गवारीच्या शेंगांची चटपटी भाजी रेसिपी

Webdunia
बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
गवारीच्या शेंगा- 250 ग्रॅम 
कांदा-1 बारीक चिरलेला 
लसूण - 4 पाकळ्या 
टोमॅटो - 1 बारीक चिरलेला 
हळद- 1/4 चमचा 
तिखट -1/2 चमचा 
धणे पूड -1 चमचा 
जिरे -1/2 चमचा 
मीठ चवीनुसार 
तेल - 2 चमचे 
पाणी आवश्यकतेनुसार 
 
कृती-
सर्वात आधी गवारीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्याव्या व छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यावा. यानंतर या शेंगांना मीठ घालून पाण्यामध्ये उकळवून घ्या. उकळल्याने यामधील कडवटपणा दूर होतो.  उकळल्यानंतर तसेच त्यातील पाणी काढून घ्यावे. आता एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालावे.मग त्यामध्ये लसूण आणि कांदा घालून परतवून घ्यावा. आता यामध्ये हळद, तिखट, धणे पूड घालून परतवून घ्या. आता यामध्ये टोमॅटो घालून नरम होइसपर्यंत परतवून घ्यावा. टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये शेंगा घालाव्या. आता पाच मिनिट शिजू दिल्यानंतर त्यामध्ये पाणी घालावे. आता थोड्यावेळाने गॅस बंद करून द्यावा. तर चला तयार आहे आपली गवाराच्या शेंगांची चटपटीत भाजी, जी तुम्ही पोळी किंवा भाकरी सोबत नक्कीच सर्व्ह करू शकतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Green Apple Juice Recipe: आरोग्यवर्धक हिरवे सफरचंद ज्यूस

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्या, आरोग्याचे 4 फायदे

APJ Abdul Kalam Birthday : मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवन परिचय

आरोग्यवर्धक मेथीदाणे आणि सुंठाचे लाडू रेसिपी

Career Tips: टनल इंजिनिअर बनून कॅरिअर बनवा, दरमहा लाखो कमवा

पुढील लेख
Show comments