Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Crispy Rice Mathri : उरलेल्या भातापासून बनवा कुरकुरीत मठरी, जाणून घ्या रेसिपी

Webdunia
रविवार, 17 डिसेंबर 2023 (17:43 IST)
Crispy Rice Mathri :आपण नाश्त्यात काही तरी वेगळे करतो.कधी कधी जास्त जेवण राहते तर ते टाकणे चांगले नसते. उरलेल्या भातापासून मठरी बनवू शकता.ही मठरी अतिशय खुसखुशीत आणि चवदार असून  बनवायलाही खूप सोप्या असतात. चला तर रेसिपी जाणून घेऊ या. 
 
साहित्य 
 
एक वाटी भात
टोमॅटो
2 हिरव्या मिरच्या
कलौंजी
हिंग 
मीठ
चिली फ्लेक्स
कढीपत्ता
 
मठरी बनवण्यासाठी एका भांड्यात भात घाला.  आणि त्यात चिरलेला टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घाला.
सर्वकाही चांगले बारीक करा, पाणी घालू नका अन्यथा पिठ ओले होईल. 
टोमॅटोमध्ये असलेले पाणी ते चांगले बारीक करेल आणि जेवणाची चव वाढवेल.
हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढून त्यात तांदळाचे पीठ टाका, हवे असल्यास रव्याचे पीठ घालू शकता.
कढीपत्ता या तांदळाच्या मिश्रणात घाला.
आता त्यात कलौंजी, हिंग, मीठ आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा.
आता पीठ घेऊन त्याचे पातळ गोळे करून गोलाकार किंवा  चौकोन च्या आकारात कापून घ्या.
कापण्यापूर्वी त्यांना काट्याने टोचून घ्या, म्हणजे मठरी  फुगणार नाही.
जर आकार असमान असेल तर ते पुन्हा रोल करा आणि कापून घ्या.
आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा आणि ते गरम झाल्यावर मध्यम आचेवर मठरी  तळून घ्या आणि सोनेरी झाल्यावर बाहेर काढा.
 
मठरी बनवण्याच्या टिप्स-
मठरीच्या पिठात जास्तीचे पाणी घालू नये.
तुम्हाला हवे असल्यास मठरीमध्ये कोथिंबीर, लसूण, आले यांचा वापर करू शकता , चव चांगली येईल.
टोमॅटोचे प्रमाण वाढवू नका अन्यथा चव खराब होऊ शकते.
मठरीसाठी, पुरी पातळ लाटून घ्या नाहीतर ती कुरकुरीत मठरी होणार नाही.
कुरकुरीत मठरी साठी आच मध्यम ठेवा.
 
Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Pearl Millet हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे 5 फायदे, गव्हापेक्षा बाजरी कशा प्रकारे अधिक आरोग्यदायी जाणून घ्या

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे वंध्यत्व आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो !

Brain Health दररोज अंडी खाणे मेंदूसाठी फायद्याचे

पार्टनरशी हे 5 खोटे बोला जर तुम्हाला तुमचं नातं घट्ट करायचं असेल

पंचतंत्र : दोन तोंड असलेला पक्षी

पुढील लेख
Show comments