Marathi Biodata Maker

मुलांना खुश करायचे असल्यास घरच्या घरी पिझ्झा बनविण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या

Webdunia
गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (12:47 IST)
आपल्याला दररोजचा हा मोठा प्रश्न पडत असतो की स्वयंपाकात काय करावं. मुलांना दररोज चे तेच ते खाऊन कंटाळा आलेला असतो. त्यामुळे त्यांची मागणी असते काही तरी चविष्ट आणि वेगळं करण्याची. त्यासाठी कधी तरी पिझ्झा करावा. पिझ्झा हा मुलांनाच नव्हे तर मोठ्यांना देखील आवडतो. याचा चवीमुळे आजकाल प्रत्येक पार्टी किंवा समारंभाचा मेन्यूचा एक भाग बनत आहे.
 
 सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकं बाहेरून काहीही खायला मागविण्यासाठी घाबरतंच आहे. पण आपण आता या इटालियन डिशला घरी देखील तयार करू शकता. होय, घरच्या घरी, कसे काय चला तर मग बघू या की घरच्या घरी पिझ्झा कसं काय बनवू शकतो.
 
पिझ्झा बनविण्यासाठीचे साहित्य-
8 मोठे चमचे मैदा किंवा गव्हाचं पीठ, 1/4 चमचा बॅकिंग पावडर, बॅकिंग सोडा चिमूटभर, 6 मोठे चमचे दूध, 1/4 चमचा मीठ, 1/2 कप पिझ्झा सॉस, 2 मोठे चमचे ऑलिव्ह तेल, 5 मोठे चमचे मॉझरेला चीज, 1 चमचा ओरेगॅनो, 1 चमचा चिली फ्लेक्स.
 
कृती - 
पिझ्झा बनविण्यासाठी सर्वप्रथम एका मायक्रोवेव्ह सेफ मग मध्ये पीठ, बॅकिंग पावडर, बॅकिंग सोडा आणि मीठ मिसळा. एका चमच्यानं सर्व जिन्नस मिसळून घ्या. आता मगात दूध आणि तेल मिसळून या मध्ये पिझ्झा सॉस आणि चीज घालून ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स शिंपडावे. आता याला 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून द्या. आपला पिझ्झा तयार आहे. गरम पिझ्झा सॉस बरोबर खाण्यासाठी सर्व्ह करा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

पायलट होण्यासाठी तुम्हाला कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात

दूषित पाणी प्यायल्याने होऊ शकतात हे 11 गंभीर आजार, जाणून घ्या

केस धोक्यात असल्याचे हे 5 संकेत देतात, दुर्लक्ष करू नये

टायफॉइड का होतो, कारणे, लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

जेवणानंतर अन्न सहज पचण्यासाठी ही योगासने करा

पुढील लेख
Show comments