Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेसळयुक्त टाळा आणि घरी बनवा ताजी व सुगंधी धणे पावडर

coriander powder
, शनिवार, 11 ऑक्टोबर 2025 (15:08 IST)
स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहे जे दररोज वापरले जातात आणि ज्याशिवाय कोणतीही भाजी शिजवली जात नाही. असाच एक मसाला म्हणजे धणे पावडर. दुकानातून विकत घेतलेली धणे पावडर बहुतेकदा भेसळयुक्त असते जी आरोग्यासाठी देखील हानिकारक असू शकते. पण आज आपण घरीच  शुद्ध आणि ताजी धणे पावडर कशी बनवावी जाणून घेऊया....
 ALSO READ: मसाले पावसात खराब होतात का? या 9 युक्त्या वापरून पहा
घरगुती धणे पावडर रेसिपी
सर्वात आधी धणे स्वच्छ करावे. धूळ, खडे किंवा खराब झालेले धणे काढून टाकण्यासाठी संपूर्ण धणे चांगले चाळून घ्या. जर धणे स्वच्छ असेल तर ते धुण्याची गरज नाही. आता संपूर्ण धणे एका पॅनमध्ये मंद आचेवर दोन मिनिटे हलके भाजून घ्या. व थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढा. आता थंड केलेले धणे मिक्सरमध्ये घाला बारीक दळून घ्या. यामुळे सुगंध वाढेल आणि पावडर जास्त काळ ताजी राहील. तसेच पावडर हवाबंद डब्यात आणि थंड, कोरड्या जागी साठवा. तर चला तयार आहे आपली सुगंधी आणि चवदार, दीर्घकाळ टिकणारी धणे पावडर.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Oats Dhokla हेल्दी ओट्स ढोकळा रेसिपी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Celebrating Idli Doodle गुगलने इडलीला समर्पित केले खास डूडल, लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थांच्या उत्पत्तीबद्दल सर्व काही