Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाश्ता काय करायचा? किमान महिनाभर रिपीट होणार नाही अश्या पौष्टिक आणि सोप्या ब्रेकफास्टची यादी बघा

healthy breakfast list
किमान ३०-३५ दिवस रोज वेगळा, पौष्टिक, सोपा आणि जास्तीत जास्त १५ मिनिटांत तयार होईल असा नाश्ता :
 
ओट्स खिचडी – ओट्स आणि भिजवलेली मूंग डाळ तेलात तडतडवून भाज्या घालून ५ मिनिट शिजवून घ्या.
कांदा पोहे – पोहे धुवून घ्या. कांदा-मिरची-हळदाची फोडणी द्या. लिंबू आणि कोथिंबीर घाला.
कोथिंबीर पोहे – तडक्यात भरपूर कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाणे घालून पोहे मिक्स करा.
रवा उपमा – रवा भाजून ठेवा. जिरे, मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, भाज्या घालून वाफवून घ्या.
साबुदाणा उपमा – भिजलेला साबुदाणा फोडणीत शेंगदाणाकूट, बटाटा परतून घ्या.
व्हेज उपमा – रव्याला गाजर-बीन्स-मटार घालून नेहमीप्रमाणे करा.
मूंग डाळ चीला – रात्रभर भिजवलेली मूंग डाळ हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घ्या. तव्यावर पातळ पसरवून २ मिनिटे दोन्ही बाजू शेका.
पालक बेसन चीला – बेसन आणि बारीक पालक, मसाले पाणी घालून भिजवून घ्या. तव्यावर पसरवून तयार करा.
टोमॅटो बेसन चीला – बेसनमध्ये टोमॅटो-कांदा-कोथिंबीर बारीक घालून पातळ पसरवून तयार करा.
पनीर भुर्जी – पनीर किसून कांदा-टोमॅटो-मिरची मसाल्यासह परतून घ्या.
मिक्स स्प्राउट्स उसळ – उकडलेले स्प्राउट्स उकळून मिरची-हळद-गोडा मसाला घालून ३ मिनिटे शिजवून घ्या.
काळा चणा उसळ – रात्रभर भिजवलेले उकडून कांदा-टोमॅटो आणि मसाले घालून परतून घ्या.
स्प्राउट्स सॅलड – उकडलेले स्प्राउट्स टोमॅटो-कांदा-लिंबू-चाट मसाला दही मिक्स करुन घ्या.
दही पोहे – पोहे धुवून पाणी निचरा. दही, मीठ घालून तडका द्या. कोथिंबीर घालून मिक्स करा.
मिसळ पाव – उसळवर फरसाण आणि कांदा घालून पाव सोबत खा.
थालीपीठ – भाजणीत कांदा-कोथिंबीर घालून पीठ मळून तव्यावर थापून दोन्ही बाजू भाजा.
नाचणी डोसा – नाचणी पीठ, उडीद डाळ पीठ मिसळून घ्या. तव्यावर पातळ पसरवून तयार करा.
राजगिरा चीला – राजगिर्‍याच्य पिठात पाणी आणि मीठ मिक्स करा. पातळ सर मिक्स करून तव्यावर थापा.
खमण ढोकळा – रेडी पीठात पाणी घाला. १० मिनिट वाफवून तडका घाला.
इडली – रेडी बैटर इडली कुकरमध्ये १० मिनिट वाफेवर बनवा.
रवा इडली – रवा, दही, फ्रूट सॉल्ट मिक्स करुन १० मिनिट वाफेवर तयार करा.
ओट्स इडली – ओट्स पावडर, रवा, दही आणि भाज्या वाफेवर १२ मिनिट शिजवून घ्या.
पनीर पराठा – चपाती पीठात पनीर किसून, मसाले भरून लाटून तव्यावर भाजा.
आलू पराठा – उकडलेला बटाटा, मसाले मिक्स करुन पिठात भरून भाजा.
मेथी पराठा – पीठात बारीक मेथी, मसाले घेऊन लाटून भाजा.
गाजर पराठा – किसलेले गाजर, मसाले पीठात मळून लाटा.
ग्रिल सँडविच – ब्रेडवर चीज, भाज्या, चटणी ग्रिलर/तव्यावर ३ मिनिटे ग्रिल करुन घ्या.
केळी रोल – चपातीवर पीनट बटर, केळीचे तुकडे ठेवून गुंडाळा.
ओट्स स्मूदी बाउल – दही, केळी, ओट्स, नट्स ब्लेंड करुन वर फळे घाला.
चिया पुडिंग – रात्री दूध/दही, चिया सीड्स भिजवून ठेवा, सकाळी फळे घालून खा.
दही-फ्रूट बाउल – दही, मनुका, फळे, पोहे चिवडा/मुरमुरे घालून मिक्स करा.
उडदाची खिचडी – उडीद डाळ, तांदूळ भिजवून कुकरमध्ये २ शिट्ट्या घ्या. तडका घाला.
पौष्टिक शीरा – रवा भाजा, गूळ, दूध, ड्रायफ्रूट घालून ५ मिनिट शिजवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिवाळ्यात खाण्यास चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर अशी झटपट मुळा चटणी बनवा