सध्या देशात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे, तसेच वातावरण आल्हाददायक असते अश्यावेळेस काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. म्हणून आज आम्ही तुम्हाला एक नवीन रेसिपी सांगणार आहोत जिचे नाव आहे इडली मंचूरियन रेसिपी. तर चला जाऊन घ्या रेसिपी.
साहित्य-
लहान आकारची इडली साधारण 16
1 चमचा तेल
1 कांदा बारीक चिरलेला
1 शिमला मिरची बारीक चिरलेली
1 कप गाजर बारीक चिरलेले
दीड कप बारीक चिरलेली कोबी
4 लसूण पाकळ्या
आल्याचा 1 छोटा तुकडा
सोया सॉस 1 चमचा
व्हिनेगर 1 चमचा
हिरवी मिरची सॉस 1 चमचा
रेड चिली सॉस 1 चमचा
टोमॅटो सॉस 1 चमचा
कॉर्नफ्लोर 1 चमचा
मीठ 1/2 चमचा
काश्मिरी लाल मिरची 1/2 चमचा
चिली फ्लेक्स 1/2 चमचा
कृती-
इडली मंचूरियन बनवण्यासाठी सर्वात आधी कांदा, आले, हिरवी मिरची आणि लसूण गरम तेलात परतवून घ्यावे. आता त्यात सर्व भाज्या घाला आणि थोडावेळ शिजवावे. एका भांड्यात अर्धा कप पाणी घेऊन त्यामध्ये सर्व सॉसेज, मीठ आणि कॉर्नफ्लोअर घालून नीट ढवळून घ्यावे. आता भाज्यांमध्ये हे सॉस घालावे. आता त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची आणि चिली फ्लेक्स घालून मंद आचेवर नीट ढवळून ते घट्ट होईपर्यंत शिजवा. तसेच चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि तयार ग्रेव्ही सर्व्हिंग डिशमध्ये घाला आणि वर इडली ठेवा. चिरलेल्या कांद्याने कांद्याच्या पातीने सजवा आणि सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.