Marathi Biodata Maker

वाटली डाळ: चैत्र महिन्यात ही डाळ करायची प्रथा, जाणून घ्या सोपी कृती

Webdunia
शनिवार, 28 मार्च 2020 (10:41 IST)
साहित्य- 250 ग्राम (चणा) हरभरा डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे, हळद, तिखट, मीठ, हिंग, 1/2 किसलेली कैरी, 1/2 वाटी ताक किंवा दही, किसलेलं खोबरं, तेल, मोहऱ्या (फोडणीसाठी). 
 
कृती- हरभरा डाळ स्वच्छ धुऊन 4 -5 तास भिजत ठेवावी. त्यातले सर्व पाणी काढून त्याला मिक्सरच्या पात्रात डाळ, कैरी, आलं, जिरे, हिरव्या मिरच्या टाकून आणि गरजे पुरतं ताक टाकून वाटून घ्यावं. ही वाटलेली डाळ एका पात्रात काढून त्यात तिखट, मीठ, साखर (चवीला) टाकावे. 
कढईत फोडणीसाठी तेल गरम करून मोहऱ्या, हिंग घालावे. त्यात वाटलेली डाळ, हळद टाकून परतावी. झाकण ठेवून डाळीला वाफ द्यावी. डाळ मोकळी झाल्यावर खोबऱ्याचा बुरा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम डाळ सर्व्ह करावी.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा

केसगळती रोखण्यासाठी हे हेअर पॅक लावा

श्री अक्षरावरुन मुलींची नावे

पुढील लेख
Show comments