कांदे पोहे हे सर्वनाच आवडतात. न्याहारीत खाण्यासाठी हे हमखास बनवले जातात. सकाळची न्याहारी असो किंवा संध्याकाळचा चहा असो कांदे पोहे हे बनवले जातात. बनवायला हे सोपे आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य - 2 कप पोहे, 1 मध्यम कांदा, फोडणीसाठी : मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता पाने, 4 हिरव्या मिरच्या, 4 चमचे तेल, चवीपुरते मीठ, 1 चमचा साखर, लिंबू, चिरलेली कोथिंबीर, खवलेला नारळ
कृती: पोहे भिजून घ्यावे. नंतर पाणी निठण्यासाठी चाळणीत काढून ठेवा. नंतर त्यात मीठ आणि साखर घालावी. कढईत तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरची घालून मग चिरलेला कांदा घालावा. ज्यांना शेंगदाणे आवडतं असतील ते फोडणी करताना कांदा शिजवताना थोडे शेंगदाणे घालून परतावे. कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यावर त्यात पोहे घालावे. नीट मिसळून घ्यावे. मध्यम आचेवर वाफ द्यावी . सर्व्ह करताना पोह्यांवर लिंबू पिळून वरून चिरलेली कोथिंबीर व खवलेला नारळ घालावा.गरम पोहे खाण्यासाठी तयार.