रायता फक्त उन्हाळ्यात खाण्याची चवच वाढवत नाही. परंतु आरोग्याच्या बाबतीतही याचे सेवन करणे चांगले आहे. दररोज दह्याचे सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघते. म्हणून यावेळी पालक आणि काकडी रायता तयार करा.पालक काकडी रायताची साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य-
1 वाटी दही,1/2 कांदा,काकडी ,1 वाटी उकडलेल्या पालकाची पेस्ट, जिरेपूड,काळीमिरपूड,मीठ चवीप्रमाणे.
कृती-
सर्वप्रथम दही एका मोठ्या भांड्यात काढून त्याला चांगल्या प्रकारे फेणून घ्या.त्यात चिरलेला कांदा,काकडी मिसळून घ्या. पालकाची पेस्ट घाला आणि चांगले मिसळून घ्या.त्यात चवीप्रमाणे मीठ,जिरेपूड,काळीमिरपूड,घाला थंड झाल्यावर सर्व्ह करा.