Dharma Sangrah

दिवाळी विशेष चटपटीत काजू-बदामाचे लोणचे

Webdunia
बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
आज पर्यंत आपण अनेक प्रकारचे लोणचे पहिले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? काजू बदामाचे देखील लोणचे बनवले जाते. जे चवीला तर स्वादिष्ट लागतेच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तर चला जाणून घेऊ या काजू बदामाचे लोणचे बनवावे कसे, जाणून घ्या रेसिपी. 
 
साहित्य- 
एक कप काजू
एक कप बदाम
एक चमचा काळे मीठ
एक चमचा बडीशेप
एक चमचा काश्मिरी लाल तिखट
एक चमचा गरम मसाला 
अर्धा चमचा हळद 
एक चमचा जिरे
एक चमचा मीठ
दोन चमचे आमसूल पावडर 
250 ग्रॅम साखर
चार वेलची
एक लिंबाचा रस किंवा एक चमचा व्हिनेगर
 
कृती-
सर्वात आधी एक कढई गॅस वर ठेऊन त्यामध्ये एक कप पाणी घालावे. व साखर घालावी. आता तयार होणाऱ्या पाकमध्ये वेलची पूड घालावी. व हा पाक उकळवून घ्यावा. आता यामध्ये काजू बदाम घालावे. व हे मिश्रण शिजवून घ्यावे. आता यामध्ये सर्व मसाले टाकून शिजवून घ्यावे. काजू बदाम शिजले का हे पाहून घ्यावे. जेव्हा हे मिश्रण घट्ट व्हायला लागेल तेव्हा गॅस बंद करावा. हे लोणचे थंड होण्याकरिता ठेवावे. तसेच लोणचे थंड झाल्यानंतर त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबाचा रस टाकावा तर चला तयार आहे  काजू बदामाचे आंबट गोड लोणचे जे तुम्ही पराठा किंवा पुलाव सोबत देखील सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe आळिवाची खीर

रेस्टॉरंट स्टाइल घरीच बनवा पनीर बटर मसाला रेसिपी

हिवाळ्यात पाठदुखीच्या त्रासावर हे 5 उपाय करा

बीएससी इन ऑफथल्मिक टेक्निशनमध्ये कोर्स मध्ये कॅरिअर करा

हिवाळ्यात ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी या टिप्स अवलंबवा

पुढील लेख
Show comments