Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Oats Upma पौष्टिक ओट्स उपमा रेसिपी

Oats Upma Recipe
, गुरूवार, 5 जून 2025 (17:48 IST)
साहित्य- 
एक कप -ओट्स
एक- बारीक चिरलेला कांदा
१/४ कप- बारीक चिरलेला गाजर
१/४कप- बारीक चिरलेला सिमला मिरची
१/४ कप- मटार 
एक -बारीक चिरलेली हिरवी मिरची
अर्धा इंच- किसलेले आले
कढीपत्ता
अर्धा चमचा- मोहरी
अर्धा चमचा -उडीद डाळ
अर्धा चमचा- चणाडाळ
१/४ चमचा- हळद  
मीठ
एक चमचा- तेल
एक चमचा- लिंबाचा रस
कोथिंबीर 
दोन कप- पाणी  
ALSO READ: मऊ आणि जाळीदार ढोकळा रेसिपी
कृती- 
सर्वात आधी ओट्स एका पॅनमध्ये मंद आचेवर भाजून घ्या. व एका प्लेटमध्ये काढून घ्या. आता पॅनमध्ये तेल गरम करा. मोहरी, उडीद डाळ आणि चणाडाळ गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या आणि नंतर कढीपत्ता, किसलेले आले आणि हिरवी मिरची घालून ते देखील परतवून घ्या. आता पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा व परतवून घ्यावा. मग गाजर, सिमला मिरची आणि वाटाणे घाला आणि ते दोन मिनिटे परतवून घ्या. आता हळद आणि मीठ घालून मिक्स करा आणि नंतर त्यात दोन कप पाणी घाला आणि हे मिश्रण उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर, त्यात भाजलेले ओट्स घाला आणि पॅन मंद आचेवर साधारण पाच मिनिट झाकून ठेवा जेणेकरून ओट्स पाणी शोषून घेतील.आता शेवटी गॅस बंद करा आणि ओट्स उपमामध्ये लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली ओट्स उपमा रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

६ जून १६७४ शिवराज्याभिषेक दिन; शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण माहिती