rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरीच बनवा व्हेज हक्का नूडल्स रेसिपी

Veg Hakka Noodles
, शनिवार, 31 मे 2025 (08:00 IST)
साहित्य-
नूडल्स- ३०० ग्रॅम 
कांदा- एक 
कांद्याची पात- १०० ग्रॅम 
सोया सॉस-दोन टेबलस्पून 
मीठ- अर्धा चमचा 
टोमॅटो- एक 
मिरची- एक 
हिरवी मिरची
सॉस- 
चमचा व्हिनेगर 
कृती-
सर्वात आधी कांद्याची पात, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा आणि हिरवी मिरची धुवून बारीक चिरून घ्या. आता मध्यम आचेवर एक पॅन ठेवा आणि त्यात पाणी उकळवा.  त्यात नूडल्स घाला आणि मंद आचेवर ३ ते ५ मिनिटे उकळवा. यानंतर तेल गरम करा आणि मध्यम आचेवर ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात कांदा आणि हिरवी मिरची घाला. हिरव्या कांद्याचा पांढरा भाग देखील घाला. व परतवून घ्या. नंतर उर्वरित सर्व भाज्या पॅनमध्ये घाला आणि एक मिनिट परतावा. आता त्यात सोया सॉस, व्हिनेगर आणि हिरवी मिरची सॉस आणि मीठ घाला. चांगले मिसळल्यानंतर त्यात उकडलेले नूडल्स घाला. व परतवून घ्या. तयार  व्हेज हक्का नूडल्स प्लेटमध्ये काढा. तर चला तयार आहे आपले  व्हेज हक्का नूडल्स गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोटाच्या प्रत्येक समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय अवलंबवा