Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कच्च्या पपईची स्वादिष्ट भाजी

Webdunia
गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
एक मध्यम आकाराची कच्ची पपई
दोन चमचे मोहरीचे तेल
अर्धा चमचा जिरे
1/4 चमचा हिंग
अर्धा चमचा हळद 
एक चमचा धणे पूड 
एक चमचा लाल तिखट 
अर्धा चमचा गरम मसाला 
दोन हिरव्या मिरच्या 
एक टोमॅटो बारीक चिरलेला 
अर्धा चमचा लिंबाचा रस 
चवीनुसार मीठ
कोथिंबीर 
 
कृती-
सर्वात आधी पपईचे साल काढून तिचे तुकडे करून घ्यावे. तसेच कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यावे. आता कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरे आणि हिंग घालावे. त्यानंतर हळद, धणे पूड आणि तिखट घालावे. आता कापलेले टोमॅटो आणि हिरवी मिरची घालावी. तसेच टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यामध्ये पपईचे तुकडे घालावे. व परतवून घ्यावे. 
 
आता पपईचे तुकडे परतवल्यानंतर त्यामध्ये मीठ घालावे. थोड्या वेळाने यामध्ये आमसूल पावडर आणि गरम मसाला घालावा. आता वरून हिरवी कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली कच्ची पपईची भाजी रेसिपी, तुम्ही ही पराठा सोबत सर्व्ह करू शकतात.   
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हळद रोगप्रतिकारक शक्तीसह चमकदार त्वचा देते,हळदीचे आरोग्य आणि सौंदर्य फायदे जाणून घ्या

किशोरवयीन मुलींनी सणांमध्ये मेकअप आणि त्वचेची काळजी कशी घ्यावी

नारळाचे पाणी किंवा नारळाचे क्रश रात्री पिणे चांगले आहे का?

ही चिन्हे सूचित करतात की तुमचे मूल चुकीच्या मार्गावर आहे

तेनालीराम आणि माठाची कहाणी

पुढील लेख
Show comments