कृती: सर्वप्रथम आट्यामधे चवीनुसार मीठ आणि मग तेलाचे मोहन टाकून (मुठ वळेल इतके मोहन टाकायचे) मिळवून घ्यावे. आटा घट्ट भिजवून झाकून ठेवावे. मटार उकळत्या पाण्यात शिजवून पाणी गाळून घ्यावे. मिरजी, आलं, लसणाची पेस्ट थोड्याश्या तेलात परतून घ्यावी. बटाटे व मटर कुसकरून त्यात परतलेली पेस्ट व इतर सर्व मसाले टाकून लाडवा येवढे गोळे तयार करून घ्यावे. आटाच्या पुरीत भरून कचोरी तयार करावी. एका फ्रांइग पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून कचोर्या ठेवून वरतून थोडे-थोडे तेल सोडायचे. मग झाकण ठेवून कचोर्यांना दोन्हीकडून वाफवून घ्याव्या. लालसर झाल्या की हिरवी आणि चिंचेच्या चटणीसोबत गरम गरम खाव्या.