Publish Date: Tue, 10 Feb 2026 (08:00 IST)
Updated Date: Mon, 09 Feb 2026 (12:38 IST)
व्हॅलेंटाईन वीक जो प्रेमासाठी ओळखला जातो. आज टेडी डे असून तुम्ही टेडी बेअरच्या आकाराचा एखादा पदार्थ बनवला तर तो खरोखरच 'सरप्राईज' ठरेल.
टेडी बेअर चॉकलेट बॉल
साहित्य-
१ पाकीट ओरिओ बिस्किटे
४ चमचे क्रीम चीझ किंवा कंडेन्स्ड मिल्क
विरघळलेले डार्क आणि व्हाईट चॉकलेट
कृती-
सर्वात आधी बिस्किटे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात क्रीम चीझ घालून घट्ट गोळा मळा. याचे छोटे गोळे करा. विरघळलेल्या डार्क चॉकलेटमध्ये हे गोळे बुडवून बटर पेपरवर ठेवा. टेडीचे कान बनवण्यासाठी बिस्किटाचे छोटे तुकडे किंवा लहान गोळ्या बाजूला लावा. व्हाईट चॉकलेटने डोळे आणि नाक तयार करा. १० मिनिटे फ्रिजमध्ये सेट करा.
टेडी फेस सँडविच
साहित्य-
ब्रेड स्लाईस
पीनट बटर किंवा चॉकलेट स्प्रेड
केळीचे काप
ब्लॅकबेरी किंवा काळे द्राक्ष
कृती-
सर्वात आधी ब्रेडचा एक स्लाईस घेऊन त्याला गोलाकार कापून घ्या. त्यावर पीनट बटर किंवा नुटेलाचा जाड थर लावा. केळीचे दोन काप कानाच्या जागी आणि एक काप नाकाच्या जागी ठेवा. नाकावर आणि डोळ्यांच्या जागी काळी द्राक्ष किंवा चोको चिप्स लावा. तुमचा एडिबल टेडी तयार!
टेडी बेअर पॅनकेक
साहित्य-
१ कप मैदा
१ कप दूध
२ चमचे साखर
१ चमचा बेकिंग पावडर
मध किंवा चॉकलेट सिरप
कृती-
सर्वात आधी सर्व साहित्य एकत्र करून गुठळ्यारहित बॅटर बनवून घ्या. पॅनवर थोडे तूप लावा. मध्यभागी एक मोठा गोल आणि त्याच्या वरच्या बाजूला दोन छोटे गोल अशा आकारात बॅटर ओता. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या. सर्व्ह करताना चॉकलेट सिरपने डोळे आणि तोंड काढा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik