Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Wada paav recipe : मुंबईचा वडापाव घरी बनवा, रेसिपी जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (09:03 IST)
Wada paav recipe :महाराष्ट्रात वडा पाव मोठ्या आवडीने खातात. ह्याला बटाटा वडा देखील म्हणतात,आता हा वडा पाव जगप्रसिद्ध झाला आहे. बटाटा वड्याला  पाव मधून कापून त्यात चटणी लावून ठेवतात आणि खातात.वडा पाव हा लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत हा सर्वांचा आवडता नाश्ता आहे आणि आता तुमची ही आवडती डिश फक्त 20 मिनिटांत घरी बनवू शकता.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य: 
लादीपाव, 4मोठे बटाटे, 5 हिरव्या मिरच्या, एक चमचा आले लसूण पेस्ट, कोथिंबीर, लिंबू ,तळण्यासाठी तेल,
फोडणीचं साहित्य – 2 चमचे तेल, मोहरी, जिरे, चिमूटभर हिंग, हळद
आवरणासाठी – 1 कप बेसन, आवश्यकतेनुसार पाणी, 1/2 टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा
 
कृती :-
बटाटे शिजवून मॅश करुन घ्यावे. गॅसवर कढई ठेवून 2 चमचे तेल गरम करुन मोहरी, जिरे, हिंग, हळद, बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं -लसूण पेस्ट घालावी. नंतर त्यात बटाटा घालून मंद आचेवर परतून घ्यावं. मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्यावं. शेवटी थोडा लिंबाचा रस घालावा. भाजी थंड होण्यासाठी ठेवा.
आवरणासाठी बेसनात मीठ, हळद, किंचित सोडा घालून भिजवून घ्यावे. बेसनाच्या सारणाला खूप फेणावे जेणे करून वडा मऊ बनतो.  
 
थंड झाल्यावर मिश्रणाचे छोटे गोळे करावे. कढईमध्ये तेल तापून घ्यावं आणि भिजवलेल्या बेसन पिठात तयार बटाट्याचे गोळे बुडवून तेलात तळून घ्यावे. तळून झाल्यावर पाव मधोमध उभा कापून त्यामध्ये लसणाची लाल चटणी लावून त्यावर बटाटा वडा ठेवून सर्व्ह करावे.
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

या 7 खाण्याच्या सवयींमुळे चेहऱ्याची चमक वाढते, या गोष्टी लक्षात ठेवा

जर तुम्ही योगासनांच्या या ५ टिप्स फॉलो केल्या तर व्यायामाशिवायही तुम्ही निरोगी राहाल

महाभारताच्या कथा : कर्ण आणि दुर्योधन यांच्यातील मैत्री

Vasant Panchami Special Recipe: केशरी भात

Budget 2025: कर्करोगाचा उपचार होणार सोपा, अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा

पुढील लेख
Show comments