Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Winter Recipe Palak Kabab Recipe : हिवाळ्यात बनवा पालक कबाब

Winter Recipe Palak Kabab Recipe : हिवाळ्यात बनवा पालक कबाब
, रविवार, 26 डिसेंबर 2021 (15:54 IST)
हिवाळ्यात पालक आहारात सामील करा, या प्रकारे बनवा पालक कबाब
हिवाळ्यात पालकाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पालकामध्ये भरपूर पोटॅशियम आढळते. ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर मानले जाते, कारण त्यात सोडियम कमी प्रमाणात आढळतो. हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. परंतु कधीकधी मुलांना हिरव्या पालेभाज्या खायला देणे खूप कठीण होते. जर तुम्हाला लहान मुलांसाठी काही हेल्दी बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही घरीच पालक कबाबची रेसिपी करून पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया पालक कबाबची सोपी रेसिपी-
 
पालक कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य- 
पालक - 2 कप
हळद पावडर - 1 टीस्पून
गरम मसाला - 1 टीस्पून
आमचूर - 1 टीस्पून
बेसन - 2 चमचे
ब्रेडक्रंब - 3 टेस्पून
चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार तेल
बटाटा - 2 उकडलेले
मटार - 1/3 कप
आले - 1 टीस्पून (किसलेले)
धणे - 2 टीस्पून
 
पालक कबाब बनवण्याची विधी - 
पालक कबाब बनवण्यासाठी प्रथम बटाटे आणि वाटाणे पाण्यात उकळा.
हे दोन्ही उकळले की गॅस बंद करा.
पालक गरम पाण्यात टाकून किमान 2 मिनिटे उकळवा आणि नंतर पाण्यातून काढून टाका.
नंतर थंड झाल्यावर त्यात बटाटे, मटार घाला.
सर्व बटाटे, वाटाणे आणि पालक मॅश करून चांगले मिसळा.
नंतर त्यात धणेपूड, गरम मसाला पावडर, आमचुर पावडर, भाजलेले बेसन, ब्रेडक्रंब आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.
यानंतर त्याला कबाबचा आकार द्या आणि ब्रेडक्रंबमध्ये बुडवा.
यानंतर कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात कबाब तळून घ्या.
कबाब गोल्डन फ्राय झाल्यावर एका प्लेटमध्ये काढा.
पालक कबाब टोमॅटो केचप, दही आणि चटणीसोबत सर्व्ह करता येतात.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्पदंश झाल्यास काय उपचार करावे जाणून घ्या