Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्त्री' अशी घडते

अरुणा सबाने
ND
' पेरावे तसे उगवते' ही म्हण कृषीक्षेत्रात जितकी खरी तितकीच ती शिक्षणक्षेत्रातही खरी आहे. पेरण्याची क्रिया ज्यांच्याकडून होते त्यापैकी काही सजीव व्यक्ती असतात. शिक्षक, पालक, मित्र, नातेवाईक अशा या सजवी व्यक्ती मुलांच्या मनात प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे काही पेरीत असता त. चित्रपट, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रदर्शने, वस्तूसंग्रहालये अशा माध्यमातून मुलांच्या मनात काहीबाही पेरल जाते. यापैकी व्यक्ती महत्त्वाच्या की यंत्रणा या प्रश्नाचे उत्तर देण्याचा माझा इरादा नाही. मात्र एवढे निश्चित की, सजीव व्यक्तीकडून होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचा मुलांना घडविण्यात फार मोठा वाटा असतो. हा वाटा मान्य केल्यामुळेच पालकांचा व शिक्षकांचा कालविसंगत दृष्टिकोन अधिक हानीकारक ठरतो.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्री मुक्ती चळवळीच्या झोतात वावरणार्‍या आजच्या शिक्षकांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन कोणता आहे, यावर आज प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिकणार्‍या मुलींचे म्हणजेत उद्याच्या स्त्रियांचे विकसन बर्‍याच प्रमाणात अवलंबून आहे. आजच्या माध्यमिक शिक्षकांनी कुटुंब जीवनातील स्त्रीचे स्थान, तिच्या जबाबदार्‍या तद्विषयक पात्रता अशा अनेक बाबीसंबंधी काय वाटते हे समूजन गेऊन दृष्टिकोनाता कालसुसंगतता आणणे खरे तर महत्त्वाचे आहे.

ND
मुली विनयशील, लाजाळू, निटनेटक्या व अभ्यासू असतात. असे मानून आपण त्यांच्यावर अनेक गोष्टी लादतो की काय हा विचार मनात येतो. मुली ‍अधिक विनयशील असतात, असे म्हणणार्‍या लोकांच्या मनात 'मुलींनी विनयशील असलेच पाहिजे' असा विचार असण्याचा संभव आहे. मुलीच्या जातीने निटनेटके असलेच पाहिजे (कारण असलेले सौंदर्य खुलवून मांडणे हेच त्यांचे प्रमुख भांडवल) अशा विचारांमुळे पुरुषवर्गाकडून मुलींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सुचना होत असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, मुली अभ्यासू असल्या तरी फारशा नसतात अशीही एक समजूत शिक्षकात रूढ दिसते.

या समजुतीला संशोधनाचेपाठबळ मात्र मिळत नाही. आजच्या माध्यमिक शाळांतिल मुलींना शिक्षण देणार्‍या शिक्षकांची ही अभिमते भावी काळाच्या दृष्टीने सुयोग्य आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल, ' जसा राजा तशी प्रजा' असे म्हणतात. शिक्षकांमार्फत होणार्‍या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संस्कारांचे महत्त्व जाणणार्‍या विचारवंतांनी व सामाजिक कर्यकर्त्यांनी मुलींच्या शिक्षणाशी संबंधित असणार्‍या शिक्षकांच्या विविध विचारधारणांना अधिक शास्त्रशुद्ध पाया मिळवून देण्याचा प्रयत्न करायला हवा.

' स्त्री म्हणजे फेअर सेक्स, नाजूक उन्हाने कोमेजणारी, गजगामिनी अशा रूढ कल्पनांचा पगडा अजूनही आमच्या शिक्षकांवर मोठ्या प्रमाणात दिसतो. शक्ती लागणारी, शारीरिक श्रम ज्यात आहेत अशी पुरुषीपणा निर्माण करणारी कामे स्त्रियांनी अजिबात करू नयेत असे, आमचे पुरुष आजही म्हणतात. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, आदर्श पत्नी, माता ही आहेच पण या व्यतिरिक्त तिला काय व्हावेसे वाटते याला फारसे महत्त्व दिलेच जात नाही.


ND
निसर्गानुसार मुली वयात येतात, प्रेमात पडतात आणि आपला जीवनसाथी निवडतात, अथवा वडील मंडळी त्यांचा जीवनसाथी शोधतात. परंतु हे जे घडते, याबरोबरच अन्य काही आपण घडवावे असेही प्रत्येक मुलीस वाटते. मुलींना काय व्हावेसे वाटते. याचा शोध घेताना सामाजिक संस्कारांचा त्या इच्छेला बसणारा पायबंद आमच्या शिक्षकांच्या उत्तरा‍त प्रतिबिंबित झाला आहे.

चाळीस-पन्नास वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्य उपभोगणार्‍या या देशातील शिक्षकास स्त्रीची भूमिका आदर्श गृहिणी, पत्नी व माता यापेक्षा अधिक आहे, नव्हे ती असलीच पाहिजे याची जाणीव नसेल तर, आजच्या माध्यमिक शाळेत शिकणार्‍या बहुसंख्य मुली आपल्या गळ्यात फक्त मंगळसूत्र पडण्याचीच वाट पाहत बसतील. जे सुप्त आहे त्याला अंकुरित करणे, जे अंकुरित आहे त्याला विस्तारित करणे जे विस्तारित आहे त्याला खोली प्राप्त करून देणे हे शिक्षकाचे काम आहे. आजच्या माध्यमिक शाळांतील अनेक मुलींच्या मनात आपण कोणीतरी व्हावे याबद्दलचे एक स्वप्न सुप्तावस्थेत आहे. समाजजीवनातील स्त्रीची भूमिका केवळ गृहिणी, पत्नी, माता नसून ती यापेक्षा अधिक जबाबदारीची असल्याची जाण शिक्षकात नसेल तर आमच्या अनेक मुलींची 'कोणीतरी' होण्याची स्वप्ने अंकुरित होणे कठीण होईल. इंदिरा संतांनी आपल्या 'झोका' या कवितेत म्हटले आहे -

झोका चढतो उंच उंच
मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर
त्याची ओळख पटेना!

विकसनाच्या खूप उंच झोक्यावर चढून खुली हवा चाखलेल्या स्त्रीला गुंजेएवढ्या घरात स्वत:ला दडपून राहणे कसे आवडेल? आणि ते आवडत नाही म्हणून ते गुंजेएवढे घर थोडे उलटेपालटे होणारच ना? असे होईल या भयाने स्त्रीला परंपरागत साच्यात कोंबण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न फार काळ यशस्वी होणार नाही. स्त्रीची जागृत अस्मिता तिच्या इच्छा आकांक्षाची उभारी, तिच्या व्यथांचे विस्फोट यांच्यापुढे आजची स्त्री गडकर्‍यांनी सिंधू होऊ शकणार नाही, हे ओळखून उद्याच्या स्त्रियांच्या आजच्या शिक्षकांनी आपले चष्मे पुसून साफ करायला नकोत काय?

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi