Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातृदिन निमित्त : आई

Webdunia
आठवते आई फिरफिरूनी
प्रसन्न शांत तुझे वदन
मूर्तिमंत जणू तृष्ण समाधान
विफल ज्यापुढे ज्ञान-विज्ञान
आई तू तुळशीपुढे बसून
काय पाहिलेस डोळे मिटून
तुझ्या पांढर्‍या केसांमधून
परतले कसे निवून

आई तू अतिकष्ट उपसले
दुःखाचे किती मूग गिळले
तेढ्या वागणुकी सहन केल्या
शब्दांचे प्रहार झेलले
कसा काय तुज परिस मिळाले
ज्याने केलेले लोखंडाचे सोने
काहीही नसता हातात कसे

पडू दिले नाही कुणास उणे

आणि तू म्हणावे देवाने दिले
सारे काही मला माझ्या वाट्याचे
सार्‍यांचे सुख खूप वाहिले
आता न मागणे काही राहिले
आई तू जीवनव्रत उजविले
कशात ना मन गुंतवून ठेवले
सर्वांचे इच्छित सारखे भले
सारख वाटून डोळे मिटले. 

- सुमित भानावत   

संबंधित माहिती

राहुल गांधी आजारी पडले,इंडिया' युतीच्या मेळाव्यात सहभागी होणार नाही

लोकसभा निवडणूक:शरद पवार यांनीच मला भाजपसोबत सरकार स्थापन करण्यास सांगितले अजित पवार यांचा दावा

Lok Sabha Election 2024: सपा आमदार रईस शेखने राजीनामा मागे घेतला

IPL 2024: एमएस धोनीने आयपीएलमध्ये एबी डिव्हिलियर्सचा मोठा विक्रम मोडला

कुस्तीपटू दीपक पुनिया आणि सुजितला क्वालिफायरमध्ये भाग घेता आला नाही

Ice Cream स्टोअर करताना या चुका करू नका

या 3 चमत्कारी गोष्टी रात्री दुधात मिसळून प्या,मिळतील जबरदस्त फायदे

Urine Leakage : लघवी गळतीची समस्या कारणे आणि उपचार

Stomach Burning पोटातील जळजळ शांत करतील हे 7 प्रभावी उपाय, लगेच आराम मिळेल

Beauty Advice : त्वचा ऑईली आहे का, घरगुती फेसपॅकचा उपयोग करा

पुढील लेख
Show comments