Publish Date: Sat, 11 May 2019 (15:16 IST)
Updated Date: Sat, 11 May 2019 (15:22 IST)
हे देवा घरचे लेणे
कुशीत तू विसावता,
झाले जीवनाचे सोने
ईशकृपेचे मेघ बरसले
मातृत्वाचे आशिष लाभले
बाळा मी आई झाले
सौख्यात नांदली,
अंगणात बागडली
भातुकली तुझ्या सवे पुन्हा रंगली
क्षण क्षण सुखाचे अनुभवतां
माझ्या खांद्यालगत आली
लेक निघाली सासरी
करते सुखद अक्षदांची वृष्टी
परतून पाही मागे मागे
मला भासली तिच चिमुकली
आज तुला मातृत्व लाभले
कुशीत तव बाळ आले
हिच असे नवजीवन पालवी
बहरली जीवन नभांगणी
घडव पुन्हा वीरंदाज शिवाजी
या झाशीची राणी लक्ष्मीबाई
मातृदिनी अभिनंदन करते आई
बाळा तू पण झाली आता आई