Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमांडोंचे ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो'

वेबदुनिया
सोमवार, 3 मे 2010 (14:51 IST)
गेल्‍या 40 तासांपेक्षाही अधिक वेळेपासून मुबईसह देशाला वेठीस धरून ठेवलेल्‍या दहशतवाद्यांच्‍या मुसक्या बांधण्‍यासाठी एनएसजीच्‍या कमांडोंनी 'ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो' सुरू केले आहे. या ऑपरेशनची मिनिट टू मिनिट माहिती वाचकांपर्यंत पोचविण्‍यासाठी 'वेबदुनिया न्‍यूज डेस्‍क' गेल्‍या दोन दिवसांपासून सातत्‍याने कार्यरत आहे.

नरीमन हाऊसमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईची ही 'मिनिट टू मिनिट' माहिती-

सकाळी 8.05 वाजत ा

दक्षिण मुंबईतील नरीमन हाऊसमधून दहशतवाद्यांख खात्‍मा करण्‍यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्‍या (एनएसजी) जवानांनी कारवाईला सुरूवात केली. एनएसजीच्‍या तीन हेलीकॉप्टरने 32 कमांडो नरीमन हाऊसच्‍या छतावर उतरले. अत्याधुनिक शस्‍त्रास्‍त्रांनी परिपूर्ण असलेल्‍या कमांडोंच्‍या मदतीसाठी जमीनीवरूनही कमांडो पथकाने कारवाईस सुरूवात केली.

सकाळी 8.15

दहशतवाद्यांकडून गोळीबार व ग्रेनेडचा वापर. एक कमांडो जखमी

सकाळी 8. 17

सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी नरीमन हाऊसमध्‍ये आपल्‍या जवानांपर्यंत पोचले.

8.20 वाजत ा

एनएसजीचे आणखी एक हेलीकॉप्टर नरीमन हाऊसवर उतरविण्‍यात आले. हे हेलिकॉप्‍टर सातत्‍याने ताज, ओबेरॉय आणि नरीमन हाऊसवर घिरट्या घालीत आहे.

8.39 वाजत ा

नरीमन हाऊसमध्‍ये किमान दोन दहशतवादी असल्‍याची सेनादलाच्‍या अधिका-यांची माहिती. काही वेळ लागण्‍याचे संकेत. दोन्‍ही बाजूने गोळीबार सुरूच.

9.25 वाजता

एनएसजीचे कमांडो नरीमन हाऊसचया दुस-या मजल्‍यावर पोचले. दहशतवाद्यांचे गोळीबार आणि बॉम्‍बस्‍फोट सुरूच. नरीमन हाऊसमध्‍ये निर्णायक कारवाई सुरू प्रशासनाने नरीमन हाऊसपासून माध्‍यमांच्‍या प्रतिनिधी आणि पत्रकारांना दूर केले.

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments